Take a fresh look at your lifestyle.

कचरेवाडी येथे अवैध जुगार अड्ड्यावर छापा, एका शिक्षकासह 7 जणांवर कारवाई,

2 लाख 4हजाराचा मुद्देमाल जप्त

2,058

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी शिवारातील कॅनॉलच्या बाजूस झाडाखाली 52 पानाचा मन्ना नावाचा जुगार खेळताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका शिक्षकासह 7 जणावर कारवाई केली असून 5मोटर सायकली,3मोबाईल सह 2 लाख 4 हजार 270 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
           याबाबत अधिक माहिती अशी की येथील पोलीस निरीक्षक रणजित माने यांना 28मे रोजी गोपनीय बातमीदारामार्फत कचरेवाडी येथे दिलीप मेटकरी यांचे घराचे समोर पाण्याचे कॅनॉल चे बाजुस झाडाखाली काही इसम 52पत्त्याचा मन्ना नावाचा अवैध जुगार खेळत असल्याची बातमी मिळाली त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे, पो.हे.कॉ.सुरेश गायकवाड, पो.हे.कॉ. श्रीमंत पवार, पो.हे.कॉ. हजरत पठाण, पो.कॉ. सुरेश देशमुख यांनी सदर ठिकाणी 6.30 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता त्यामधे समाधान विठ्ठल काळुंगे (वय 38),करण कालीदास कळसगडे (वय- 24),विठ्ठल यशवंत काळुंगे (वय- 70),लक्ष्मण आबा वाघमोडे( वय 60),मायाप्पा अंकुश माने (वय- 38),अंकुश रामा माने (वय- 72 )सर्व रा. कचरेवाडी,सुरेश जयवंत कट्टे (वय- 55 वर्षे रा. माळीगल्ली, मंगळवेढा) हे सात जण गोलाकार बसून 52 पत्यांचा मन्ना नावाचा जुगार खेळत असताना त्यांना पोलीसांनी जागीच पकडले. पोलिसांनी पत्याची पाने,रोख रक्कम, 5 मोटार सायकली व 3 मोबाईल असा एकूण 2 लाख 4 हजार 270 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

           सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील,पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोसई सौरभ शेटे, पो.हे.कॉ. सुरेश गायकवाड, पो.हे.कॉ. श्रीमंत पवार, पो.हे.कॉ. हजरत पठाण, पो.कॉ. सुरेश देशमुख यांनी केली आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More