Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी दाखल

आ समाधान आवताडेंच्या प्रयत्नाने ऐन उन्हाळ्यात पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले समाधान

1,296

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या म्हैसाळ योजनेचे शेतीसाठी चे पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील आसबेवाडी शिवारामध्ये दाखल झाल्याने येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले आहेत.

            सध्या मंगळवेढा तालुक्यामध्ये उष्णतेच्या तीव्रतेमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर शेती व पिण्याच्या पाण्याचाही खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून विविध पाणी प्रश्नांच्या योजना मार्गी लागत असल्याने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
            ऐन उन्हाळी दिवसांमध्ये म्हैसाळ उपसा योजनेचे हे पाणी आसबेवाडी शिवारात दाखल झाल्याने येथील नागरिकांची पाणी प्रश्नाला धरून असणारी उन्हाळी दाहकता कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच उन्हाळी पिके चारा पिके घेण्यास मदत होणार आहे. म्हैसाळ योजनेचे काम १९९२-९३ सालापासून बंद असल्याने म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूक दळणवळण व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत राज्यातील एकूण सात योजनांचा समावेश केला होता. यामध्ये आमदार आवताडे यांनी ही योजना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केला होता त्यावेळी सुमारे ३००० कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले होते. त्याचे फलित म्हणून मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात म्हैसाळ योजनेचे ही पाणी शेतकऱ्यांना पहावयास मिळत आहे.
             म्हैसाळ योजनेचे सध्या वितरिका एक मधून रविवारी लोणार, महमदाबाद, हुन्नूर या भागात पाणी पोहोचले आहे तर वितरिका दोन मधून मारोळी शिवारात पाणी दाखल झाले आहे तर जंगलगी, चिखलगी,पौट,सलगर खुर्द,सलगर बुद्रुक या गावांनाही लवकरच पाणी मिळणार आहे तर उमदी डी वाय मधून आसबेवाडीत पाणी दाखल झाले असून सोड्डी, शिवनगी येळगी या भागांनाही लवकरच पाणी मिळणार आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील उर्वरित गावांना ही लवकरच पाणी उपलब्ध होणार असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा सुरू असल्याचेही आ समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.

 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More