Take a fresh look at your lifestyle.

…..त्या अनोळखी तरुणीला मंगळवेढा पोलिसांकडून माणूसकीचे दर्शन

शासकीय गाडीने केले घरपोच

863

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा बसस्थानकावर एक 28 वर्षीय तरुणी गुरुवारी पहाटे 2.30 वाजता एकटीच पोलीसांना मिळून आल्याने तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी माणूसकीचे दर्शन दाखवत पोलीस ठाण्यात आणून भोजनाची व्यवस्था करुन तिच्या कुटूंबियाचा शोध घेवून तिला शासकीय गाडीने घरपोच करण्याचे काम केले.

याबाबत अधिक माहिती अशी, की,मंगळवेढा बसस्थानकावर दि.25 च्या पहाटे 2.30 वाजता पोलीस गस्त घालीत असताना 28 वर्षीय तरुणी
एकटीच मिळून आली. याबाबत तिच्याकडे अधिक चौकशी केली असता कौटूंबिक वादातील त्रासाने निघून आल्याचे पोलीसांना सांगितले. पोलीसांनी त्या तरुणीच्या संरक्षणाच्या दृष्टीने तिला पोलीस ठाण्यात आणून तिच्या झोपण्याची,जेवणाची व्यवस्था माणूसकीच्या दृष्टीने करण्यात आले. तिच्या सांगण्यावरुन पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली कुटूंबियाशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली.

दि.25 च्या रात्री 9 वाजेपर्यंत कुटूबियाची वाट पाहण्यात आली मात्र कुटूंबातील कोणीच न आल्याने अखेर शहर बीटचे पोलीस हवालदार हजरत पठाण, पोलीस शिपाई खंडाप्पा हत्ताळी, महिला पोलीस नाईक रंजना मोरे आदींनी शासकीय गाडीने त्या तरुणीच्या मुळगावी नेवरे ता.माळशिरस येथे रात्री 11.30 वाजता सुरक्षितरित्या पोहच करुन कुटूंबियाच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस आपल्या मुलीला सुरक्षित घेवून आल्याचे पाहून कुटूंबियातील आई,वडील,भाऊ यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले तसेच तेथील सरपंच व कुटूंबियाने मंगळवेढा पोलीसांना धन्यवाद देवून आभार मानले. दरम्यान मागील चार महिन्यापुर्वी मोहोळ तालुक्यातील अशीच एक तरुण मुलगी रात्री 1 वाजता मंगळवेढा बसस्थानकावर एकटीच मिळून आली होती. तिलाही पोलीस ठाण्यात आणून तिच्या कुटूंबाचा शोध घेवून कुटूंबियांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी या घडवलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More