Take a fresh look at your lifestyle.

फटेवाडीच्या प्रज्ञाने एम पी एस सी मार्फत कक्ष अधिकारी बनून वडिलांना दिली वाढदिवसाची अमूल्य भेट

1,246

- Advertisement -

मंगळवेढा संभाजी नागणे
फटेवाडी ता मंगळवेढा येथील दामाजी कारखान्यात कार्यालयीन अधीक्षक म्हणून काम पाहणारे दगडु फटे यांची मुलगी एम पी एस सी2021मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवल्याने मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणुन दिनांक 24 रोजी  निवड झाली. त्याच दिवशी तिच्या वडिलांचा वाढदिवस असल्याने मुलीने शिक्षणासाठी कष्ट घेतलेल्या आपल्या वडिलांना वाढदिवसाची अमूल्य भेट देवून वडिलांच्या कष्टाचे सार्थक केले आहे.

         मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी सारख्या ग्रामीण भागतील प्रज्ञा दगडु फटे हिने २०२१ मध्ये झालेल्या राज्यसेवा आयोगाचे परिक्षेमध्ये 900 पैकी527 गुण मिळवुन राज्यात मुलीमध्ये 39 वी रँक मिळविली होती. दि24मे2023 रोजी राज्यसेवा आयोगाने जाहिर केलेल्या निकालानुसार प्रज्ञा हीची मंत्रालय कक्ष अधिकारी पदावर निवड झाल्याचे जाहीर केले आहे. ग्रामीण भागतील असून देखील प्रज्ञा हिने हुशारी, जिदद्, चिकाटी व अविश्रांत परिश्रम घेत तिने हे यश यश प्राप्त केले आहे. तिचे वडील दामाजी साखर कारखान्यातील प्रशासन विभागाकडे कार्यालय अधीक्षक म्हणुन कार्यरत आहेत.                 तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या फटेवाडी येथील शाळेत झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंगळवेढा येथे दामाजी हायस्कूल व कालेजमध्ये झालेले आहे. गुणवत्तेच्या आधारे पदवी शिक्षणासाठी पुणे येथे फर्ग्युसन सारख्या नामांकित कालेज मध्ये तिला प्रवेश मिळाला व तिने पदवी शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परिक्षेवर लक्ष केंद्रीत करत चांगल्या गुणासह सायन्स विभागाची पदवी घेतली. राज्यसेवा आयोगाच्या पहिल्याच परिक्षेमध्ये तिने कक्ष अधिकारी पदाची यशस्वी घोडदौड पार केली. प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न, आई वडिलांचे आशिर्वाद व टाकलेला विश्वास यामुळे हे यश मिळवु शकले असलेचे प्रज्ञा हिने सांगीतले.
            प्रज्ञाचे यशाबद्दल वडील दगडु फटे व आई परिनिता फटे बोलताना म्हणाले की सामान्य कुटुंबातील प्रज्ञाने जिद्दीने प्रयत्न करुन हे यश कमवलेले आहे. फर्ग्युसन कालेजमध्ये बीएस्सी चे शिक्षण चालू असताना प्रज्ञाला रुपये दोन लाख इन्स्पायर स्कालरशीप मिळाली. कोणतेही ध्येय प्राप्त करताना झपाटूनच कष्ट करावे लागतात हे प्रज्ञाने आज दाखवून दिले आहे. यामध्ये आमचे परिवाराने प्रज्ञावर टाकलेला विश्वास व दिलेल्या स्वातंत्र्याचे तिने सोने केले आहे. मी माझा वाढदिवस कधीही साजरा करीत नाही परंतु मुलीने हे यश मिळवून केलेल्या कष्टाचे चीज झाले असून योगायोगाने वाढदिवसा दिवशी तिची कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती म्हणजे मला ती वाढदिवसाची अमूल्य भेटच ठरली आहे.
या गावातील प्रज्ञा ही राज्यसेवा आयोगामार्फत शासकीय अधिकारी बनलेली पहिलीच मुलगी आहे.

            तिच्या या यशाबद्दल आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके, धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे,जिल्हा बँकेचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे,दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील,व्हा.चेअरमन तानाजीभाऊ खरात व सर्व संचालक मंडळ, शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, जिजामाता परिवाराचे प्रमुख रामकृष्ण नागणे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, दामाजीचे कार्यकारी संचालक रमेश जायभाय, फटेवाडीच्या सरपंच सिमा काळुंगे, जिल्हा दुध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर,उद्योजक प्रकाश काळुंगे, रावसाहेब फटे, माजी सरपंच विष्णुपंत फटे, राजेंद्र फटे,संभाजी इंगोले आदींनी अभिनंदन केले आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More