जल जीवन च्या निकृष्ट कामाबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही- आ. आवताडे यांचा इशारा
भोसे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना चार दिवसात सुरू करावे -आ समाधान आवताडे
मंगळवेढा प्रतिनिधी
तालुक्यातील जलजीवन योजनेची कामे गुणवत्तापूर्ण करावीत.निकृष्ट कामे झाल्यास त्याची चौकशी केली जाईल. कामाच्या बाबतीत कोणाचीही गय करणार नाही असा इशारा आ समाधान आवताडे यांनी दिला तसेच भोसे सह39 गावांची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अपुरी व झालेली असताना ताब्यात घेणे प्रशासनाची चूक होती गेल्या तीन वर्षापासून बंद असलेली ही योजना शासन दरबारी प्रयत्न करून दुरुस्तीसाठी निधी मिळालेला असल्याने येत्या चार दिवसात ही योजना संबंधित अधिकाऱ्याने चालू करून या भागातील लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या.
मंगळवेढा तालुक्यातील 39 गाव भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा,जलजीवन मिशन कामे ,खरीप पेरणी आढावा, प्रधानमंत्री पेन्शन योजना आदी विषयासंदर्भात आ. समाधान आवताडे अध्यक्षतेखाली शनिवार, दि. 20 मे रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयातआढावा बैठक घेण्यात आली होती
या बैठकीसाठी मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी आपासाहेब समिंदर, नायब तहसीलदार सुधाकर धाइंजे , पंचायत समिती गटविकास अधिकारी पाटील तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता पांडव, एमजेपीचे श्री.माने,आदी उपस्थित होते
यावेळी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना खरीप हंगामासाठी मिळणारे बी बियाणे खते तसेच शासनाच्या डीबीटी योजना व इतर योजनांची माहिती यावेळी तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी दिली यावेळी आमदार अवताडे यांनी खरीप हंगामात कोणत्याही शेतकऱ्यांना बी बियाणांचा तुटवडा जाणवणार नाही याची काळजी कृषी विभागाने घ्यावी युरिया व इतर खते लिंकिंग पद्धतीने न देता मागेल त्या शेतकऱ्याला खते मिळावीत बोगस बी बियाणे देणाऱ्या कंपन्या वरती कारवाई करण्याबाबत कृषी विभागाने कार्यवाही करावी तसेच नव्याने 26 ठिकाणी बसवण्यात येणारे स्वयंचलित पर्जन्यमापक तातडीने बसवण्यात यावी. शेततळे ट्रॅक्टर अनुदान व इतर योजनांचे अनुदान शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आ आवताडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे प्रधानमंत्री सन्मान योजनेमधे 54478 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून त्यामधे 48358 पात्र ठरले आहेत 5809 अपात्र ठरले असून त्यानंतर 792 लोकांनी अर्ज केले त्यांची मंडल पातळीवर चौकशी सुरु असून 354 नवीन अर्ज केलेल्या 128 अर्जांची देखील चौकशी असल्याचे सांगितले तसेच तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास अडचण येत असल्याचे सांगत शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत प्रत्येक मण्डल स्तरावर पी एम किसान योजनेचा लाभ देण्यासाठी मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगितले यावेळी आ आवताडे यांनी पी एम किसान योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळवून द्या,तहसील मधील झिरोंचा बंदोबस्त करून या योजनेसाठी नवीन अधिकारी नियुक्त करा करून स्वतंत्र यंत्रणा राबवा,तसेच शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सिबिल चेक न करता बँका कडून कर्ज मिळावे यासाठी बँकांची बैठक लावून पिक कर्ज योग्यरीत्या वाटप झाले आहे की नाही असे पाहण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता पांडव यांनी भोसे प्रादेशिक योजनेचे वीज बिल 1कोटी17लाख थकित असून 35 लाख भरले असल्याचे सांगत इतर दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले या योजनेतील सहा गावांना पाणी जात नसून शेष फंडातून 10लाख दुरुस्तीसाठी मिळणार आहेतअसे संगितले यावेळी आ आवताडे यांनी भोसे योजनेची कामे अपुरी असताना प्रशासनाने ताब्यात घेतली ही योजना गेली दोन वर्ष योजना बंद आहे यातील 11गावांना पाणी मिळत नाही 5गावांना पाणी चढत नाही.तर काही गावांना पाणी नुसते टेस्ट केले त्यामुळे योजनेसाठी 80कोटी खर्चून देखील लाभार्थी गावांना पाणी मिळत नाही. सध्या प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही योजना कार्यान्वित केली जात आहे एमजीपीच्या अधिकाऱ्यांनी योजना हस्तांतरित करून जिल्हा परिषदेकडे वर्ग केली आहे ही योजना चार दिवसात चालू करून या भागातील लोकांना पाणी द्यावे या लाभार्थी गावांना पाणी न पोचल्यास माझ्याशी गाठ असल्याचा इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिला तसेच या योजनेतील जी गावे पाणी घेत नाहीत ते उरलेले पाणी हॅटसन डेअरी घेण्यास तयार असून औद्योगिक पाणी वापरामुळे योजना चालण्यास मदत होणार आहे.
यावेळी जलजीवन ची माहिती देताना श्री. पांडव म्हणाले तालुक्यात
62कामे मंजूर असून त्या कामासाठी 46.65कोटी निधी मिळाला आहे. 5 कामांची वर्क ऑर्डर येणे बाकी असून 11 कामे विविध अडचणीमुळे प्रलंबित आहे य 45कामे सुरू असून 6.95कोटी खर्च झालाआहे. त्यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जलजीवनची कामे अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असून ही कामे मॅनेज करून ठराविक ठेकेदारांना दिल्याचा आरोप यावेळी उपअभियंता पांडव यांच्यावर करण्यात आला. दोनज येथील पदाधिकारी व दामाजी संचालक अशोक केदार यांनी डोनज येथील काम निकृष्ट झाल्याचे सांगत पांडव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली यावेळी आमदार अवताडे यांनी मध्यस्थी करत या कामाची त्रयस्थ यंत्रनेकडून चौकशी करणार असल्याचे सांगितले. उप अभियंता पांडव हे निकृष्ट कामाकडे लक्ष न देता ठेकेदाराची बाजू घेऊन पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा करत असल्याचा आरोप देखील यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी पांडव यांना जलजीवन च्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत कामे गुणवत्ता पूर्ण करा अन्यथा चौकशीला सामोरे जावे लागेल असे सांगितले तसेच पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा योग्य नाही. ठराविक ठेकेदाराला काम देण्यासाठी टेंडर मॅनेज केले का असा प्रश्न उपस्थित केला. तालुक्यातील जलजीवन च्या निकृष्ट कामाबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता कामे चांगल्या पद्धतीने करा ग्रामीण भागातील लोकांच्या पिण्याच्या सोयीसाठी सरकारने निधी दिला असून त्या निधीचा योग्य सदुपयोग व्हावा यासाठी तुमची यंत्रणा कामाला लावा कामात सुधारणा करून पदाधिकारी प्रशासन समन्वय ठेवा, डोनज येथील कामाची चौकशी करून तथ्य आढळल्यास तालुक्यातील सर्वच कामांची चौकशी केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज झालेल्या आढावा बैठकीत प्रामुख्याने पी एम किसान पेन्शन योजना जलजीवन च्या विविध कामासंदर्भात अधिकाऱ्यांना नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी चांगले धारेवर धरले.
यावेळी गटविकास अधिकारी पाटील यांच्या कारभाराबाबत माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर गटविकास अधिकारी बोलण्यास उभा राहिले परंतु आमदार समाधान आवताडे यांनी पंचायत समिती विभागाची स्वतंत्र बैठक लाऊ असे सांगितलेमुळे गटविकास अधिकारी यांना हायसे वाटले अन्यथा गटविकास अधिकाऱ्यांच्या पदाधिकारी व नागरिक त्यांच्या कारभाराबाबत चांगलेच तासून होते. यावेळी खत दुकानदारांकडून युरिया महाग दिला जातो. ठराविक बियाणे घ्या म्हणून आग्रह केला जातो असे न करता मागील ती बियाणे खते औषधे दिली जावी तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्या व दुकानदार यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रना कार्यरत ठेवावी असेही आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी सांगितले.

