आज दि 20 रोजी आ. समाधान आवताडे घेणार कृषी, महसूल, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध खात्यांची नागरिक व अधिकार्यांची एकत्रित बैठक
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील 39 गाव भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा,जलजीवन मिशन कामे ,खरीप पेरणी आढावा, पाणी टंचाई, गाळ मुक्त तलाव गाळ युक्त शिवार योजना राबवणे प्रधानमंत्री पेन्शन योजना आदी विषयासंदर्भात आ. समाधान आवताडे अध्यक्षतेखाली शनिवार, दि. 20 मे रोजी सकाळी 10वा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयातआढावा बैठक होणार आहे. यावेळी नागरिकांनी आपल्या अडचणी व समस्या लेखी स्वरुपात आणण्याचे आवाहन आ समाधान आवताडे यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे
या बैठकीसाठी मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी, तहसीलदार , पंचायत समिती गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबधित विभागातील सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी सदर बैठकीसाठी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, शेतकरी बांधव व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार जनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा यांचे कडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी महावितरणच्या अधिकऱ्यांसमवेत आ. आवताडे यांनी बैठक घेतली होती. यावेळी 175नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या होत्या.त्यातील अनेक समस्या येथील अधिकाऱ्यांच्या पातळीवरील सोडवण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. आजच्या बैठकीत देखील नागरिक व अधिकारी समोरासमोर येवून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत होणार आहे.

