Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढयातअवैधरीत्या लोखंडी कोयता व सुरी बाळगणाऱ्या 22 वर्षीय युवकास अटक

मंगळवेढा पोलिसांची कामगिरी

2,373

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

          मंगळवेढा शहरातील मार्केट यार्डातील झाडाच्या आडोशाला अवैधरीत्या लोखंडी कोयता व सुरी बाळगणाऱ्या विशाल उर्फ भैय्या अरुण हजारे (वय २२ वर्ष रा. हजारे गल्ली मंगळवेढा) या युवकास मंगळवेढा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील शस्त्र जप्त केले आहेत.
           याबाबत अधिक माहिती अशी की दि.18रोजी ते दिनांक 19 दरम्यान अमावस्या असलेने पोलिसांकडून पहाटे ५ वाजे पर्यंत ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले होते दरम्यान मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात आरोपी चेक करणे, अवैद्य अग्निशस्त्रे बाळगणारे इसमाचा शोध घेणेकरिता पेट्रोलिंग करत असताना मंगळवेढा शहरातील मंगळवेढा मार्केट यार्ड मधील मोकळ्या जागेत लिंबाच्या झाडाच्या आडोशाला एक इसम मिळुन आला असता पोलीसांनी सदर इसमास ताब्यात घेवून त्याचे जवळील एक लोखंडी कोयता व लाकडी मुठ असलेली सुरी जप्त करून त्यास अटक केली असून त्याचे नाव विशाल उर्फ भैय्या अरुण हजारे (वय २२ वर्ष रा. हजारे गल्ली मंगळवेढा) असे आहे.त्याचे विरोधात मंगळवेढा पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

          सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, श्रीमती राजश्री पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने पो.हे.काँ दयानंद हेबांडे, पोहेकॉ हजरत पठाण, पोकों अजित मिसाळ, पोकों सुरज देशमुख यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना तलवार मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More