Take a fresh look at your lifestyle.

मारापुर सोसायटीमध्ये आवताडे गटाकडून पाटील गटाच्या सत्तेला सुरुंग

आवताडे गटाचे विनायक यादव यांच्याकडे एकहाती सत्ता

503

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
         मारापुर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अत्यंत चुरशीने पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत आवताडे  गटाने वर्चस्व मिळवले असून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व दामाजीचे विद्यमान संचालक प्रा.पी.बी.पाटील यांच्या समविचारी गटाला धक्का दिला आहे. पाटील यांना माजी संचालक बळवंत पाटील,मोहन यादव,दत्तू आसबे,दिनकर यादव,हरी यादव यांची साथ लाभली होती.

          ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सोसायटी निवडणुकीत विद्यमान सरपंच विनायक यादव यांनी दुसरा धक्का दिला आहे.या निवडणुकीमध्ये आवताडे गटाचे नेते व मारापुर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांनी सर्व युवा कार्यकर्त्यांना एकत्र करून एक हाती विजय खेचून आणून परिवर्तन घडवले. गेल्या अनेक वर्षापासून पाटील गटाकडे असलेली सोसायटी आवताडे गटाने खेचून आणली.
            निवडणूक निकालानंतर बोलताना यादव म्हणाले मारापुर सोसायटी सभासदांचा आर्थिक कणा असून जिल्ह्यात नंबर एकची संस्था म्हणून उदयास येईल व त्याचबरोबर सभासदांच्या विश्वास तडा जाऊ दिला जाणार नाही.या सोसायटीच्या माध्यमातून आपण नवीन संकल्पना राबविणार असून मागेल त्याला पीक कर्ज देणार आहोत असे सांगितले.
              या निवडणुकीच्या यशामध्ये माजी सरपंच भगवान आसबे, उपसरपंच अशोक आसबे, विक्रम यादव,अभिमान जानकर,सत्यवान यादव,राजकुमार यादव,तुळशीराम आसबे,नाथा माने,संतोष गांडुळे, पिंटू मांडवे,नवनाथ आसबे,तुकाराम यादव, बालाजी यादव आदींचे योगदान लाभले.
            उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे सर्वसाधारण मतदारसंघ आसबे नंदकुमार तुळशीराम(255),आसबे नवनाथ प्रल्हाद(257),आसबे राजाराम दगडू(255) यादव अशोक एकनाथ(257),यादव बाळासाहेब कुबेर(255), यादव महेश अंकुश(254),यादव परमेश्वर रावसाहेब(259) यादव राजकुमार मधुकर(259),महिला प्रतिनिधी आसबे दिपाली संतोष(267),माने अर्चना अनिल(264),विमुक्त जाती/ भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग जानकर अमोल दादा(278)तर तुळशीराम अरुण माने व भारत निवास सातपुते हे बिनविरोध विजयी झाले होते. त्यांच्या या यशाबद्दल आमदार समाधान आवताडे,डीसीसी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे,ज्येष्ठ नेते विष्णुपंत आवताडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More