Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मंगळवेढयात

इंग्लिश स्कूल येथे कृषी उद्योजकता मेळाव्याचे आयोजन - ॲड. सुजित (बापू) कदम यांची माहिती

463

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

         मंगळवेढा तालुक्यात अन्न प्रक्रिया उद्योग निर्मितीसाठी चालना मिळावी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ, इंग्लिश स्कूल येथे केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 3 वाजता कृषी उद्योजकता मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती अध्यक्ष ॲड.सुजित कदम व संस्थेच्या सचिवा प्रियदर्शनी महाडिक यांनी दिली.         

दिनांक 4 रोजी दुपारी 3 वाजता केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजक मेळावा व महोत्सवाचा समारोप होणार आहे. अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत हे असणार आहेत.यावेळी आ. समाधान आवताडे, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ. शहाजी पाटील, आ. राजेंद्र राऊत, माजीआ.प्रशांत परिचारक, प्र. कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, प्रा. शिवाजीराव सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.             

केंद्र सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील उत्पादित होणाऱ्या अन्नधान्याच्या संबंधित प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आहेत मात्र या उद्योगाची माहिती ग्रामीण भागात नसल्यामुळे अनेक जण यापासून वंचित राहिले आहेत.त्यांना या उद्योगाची माहिती व्हावी व आपल्या भागात नवीन उद्योग निर्माण व्हावेत यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . कोरोना साथीमुळे कालावधीत दोन वर्षात अनेक उद्योग बुडाले,नोकऱ्या व शिक्षणाचे मोठे नुकसान झाले आहे. अन्नधान्याची गरज सर्वानाच असल्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योग मात्र टिकून राहिला आहे. भारतात अनेक चांगले अन्न प्रक्रिया उद्योग तयार होऊ शकतात. त्याला एक चांगली बाजारपेठ मिळाल्यास या उद्योगातून लोकांना उत्पन्नाचे साधन व अनेक बेरोजगारांसह बचत गटाच्या महिलांना देखील भाजीपाला फळे यातून उपपदार्थ निर्मितीतून रोजगार निर्माण होऊ शकतो.

       आ.समाधान आवताडे हे या मतदारसंघात औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सध्या 40 पेक्षा अधिक अन्न उद्योग हे मंगळवेढा व परिसरामध्ये सुरू होऊ शकतात. तालुक्यातील उद्योजक होण्याची गुणवत्ता शेतकऱ्यांमध्ये आहे.अनेक अन्नधान्याच्या मालाचे उत्पादन होते मात्र त्याचे मार्केटिंग करणे गरजेचे आहे.शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी वेगवेगळ्या व अन्नपदार्थाची गरज आहे. ते अन्नप्रक्रिया उद्योगातील तयार अन्नाचा वापर करतात.

            कोरोनाच्या दोन वर्षातील नुकसानीमुळे परिणाम भविष्यात जाणवणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने राजकीय हेवेदावे सोडून एकत्र येण्याची गरज आहे मंगळवेढ्यातील अनेक उत्पादित अन्नपदार्थावर प्रक्रिया करून त्याला देशासह परदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून तालुक्याला आशेचा किरण सापडणार आहे. त्यामुळे ना. राणे यांचा मंगळवेढा दौरा दुष्काळी तालुक्याला दिशा देणारा ठरणार आहे.

           ४ मे रोजी सकाळी नऊ वाजता भजन आयोजित करण्यात आले आहे. तर १२ वाजता ‘भीमा’चे अध्यक्ष विश्वराज महाडिक व कुलगुरू एस. के. पवार यांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी होणार आहे.या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम,ॲड.सुजित कदम, सचिव प्रियदर्शनी कदम महाडिक, संचालिका डॉ.मीनाक्षी कदम, तेजस्विनी कदम, श्रीधर भोसले, राम नेहरवे, अजिता भोसले,अड.शिवाजी पाटील, अमीर हमजा भालदार, यतिराज वाकळे यांनी केले आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More