Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र दिनी टॉवरच्या मोबदल्यासाठी प्रहार आक्रमक

प्रांत कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलनास प्रारंभ

342

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, फटेवाडी, भाळवणी या भागातून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा 132 के व्ही उपकेंद्रासाठी गेलेला विद्युत वाहिनी टाॅवर व टॉवरच्या तारेखालील जागेचा मोबदल्या पासून येथील शेतकरी 2018 पासून वंचित असून मोबदला मिळावा यासाठी प्रहार संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने मंगळवेढा उपविभागीय कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनी अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे.
       दरम्यान या आंदोलनाकडे मंगळवेढा प्रांताधिकारी व महापारेषन कंपनीच्या अधिकाऱ्यानी पाठ फिरवली आहे. तालुक्यातील खोमनाळ, फटेवाडी, भाळवणी या भागातून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा 132 के व्ही उपकेंद्रासाठी विद्युत वाहिनी टाॅवर गेला आहे याची भरपाई मिळावी यासाठी येथील शेतकरी 2018 पासून प्रयत्न करीत असताना त्यांना योग्य तो मोबदला दिला जात नाही तसेच संबधित प्रशासन लक्ष देत नाही.महापारेषन चे अधिकारी तर शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा ऐकून घेत नाहीत.             

             महापारेषांच्या अधिकाऱ्यांनी मोठमोठ्या पुढाऱ्यांना टावर चे पैसे दिलेत किंवा तारा खालील झाडाचा मोबदला दिला आहे पण गरीब शेतकऱ्यांना त्या मोबदल्यापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप प्रहार ने केला आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवरचे काम चालू होते त्यावेळी त्या शेतकऱ्यांच्या शेतात पोलीस बंदोबस्त लावून या अधिकाऱ्यांनी काम करून घेतले त्यावेळी शेतकऱ्यांना लगेच मोबदला देऊ असे सांगितले होते ते शेतकरी 2018 पासून ते आज पर्यंत मोबदल्यासाठी धडपडत आहेत 2013 ला या कामास सुरुवात झाली या कामासाठी 2018 साली पंचनामे झाले तेव्हापासून आज तागायत शेतकरी वंचित राहिला आहे.
               त्यामुळे प्रहार चे आमदार बच्चू कडू यांच्या संघटनेने या शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनात प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, प्रहार चे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे ,तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बिले, रोहिदास कांबळे ,राहुल खंडेकर बाधित शेतकरी अशोक पवार, अर्जुन पवार ,विठ्ठल सरवदे, तानाजी ,खोमनाळचे उपसरपंच धनाजी ढेंबरे, नानासाहेब नागणे ,आनंद कोडक, अण्णासाहेब पाटील, विलास कोडक ,अशोक भालेराव, संतोष कलुबर्मे, पांडुरंग वाकडे ,मनोहर कोडक, बाळू खांडेकर ,सुरेश ढेंबरे, वंदना ढेंबरे ,संतोष पांढरे ,चरणदास सरवदे इत्यादी शेतकरी उपस्थित आहेत.

     आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे असे प्रहार चे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More