Take a fresh look at your lifestyle.

वादळी वाऱ्यामुळे 2 जनावरे मृत, 12 जखमी, 40 घरांवरील पत्रे उडाले महावितरणचे 25 पोल जमीनदोस्त

आ समाधान आवताडे यांच्याकडून पंचनामे करण्याचे आदेश, तहसीलदार मदन जाधव घटनास्थळी

1,914

- Advertisement -

मंगळवेढा संभाजी नागणे
          मंगळवेढा तालुक्यात दि 29 रोजी लक्ष्मी दहिवडी महमदाबाद (शे),मारापुर  गुंजेगाव तसेच लवंगी व सलगर खु या भागात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. महमदाबाद (शे) येथे वीजेची तार तुटून करंट लागल्याने दोन जनावरे मयत झालीअसून लक्ष्मी दहिवडी येथे 12 जनावरे अंगावर पत्रे पडून जखमी झाली आहेत. महावितरणचे 25 ते 30पोल मोडल्याने दोन गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.तसेच फळबागासह इतर अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.40ते45 घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. 

        गेल्या दोन-तीन दिवसापासून मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.ऑक्टोबर मध्ये झालेल्या नुकसानीची अजून भरपाई मिळालेली नाही तोपर्यंत एप्रिल मध्येअवकाळी पावसाने पुन्हा तडाखा दिल्याने शेतकऱ्यांना ‘अवकळा’ आली आहे.दिनांक 29 रोजी दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान अचानक विजांचा कटकडाट व वादळी वाऱ्यामुळे लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद, (शे) शेलेवाडी, आंधळगाव, मारापुर गुंजेगाव परिसरात आंबा पपई द्राक्ष,डाळिंब, पिकाचे मोठे नुकसान झाले.

आ समाधान आवताडे यांनी दिले पंचनाम्याचे आदेश

         

 

 

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी महमदाबाद(शे),गुंजेगाव  लवंगी सलगर सह अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे  अवकाळी वादळी पावसामुळे या भागातील घरांचे लहान मोठ्या स्वरूपात नुकसान झाले आहे. एकाच वेळी सर्वत्र अवकाळी पाऊस न पडता विविध ठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसत आहे. तरी या सर्व भागात प्रशासनाने पाहणी करून पंचनामे करावेत असे आदेश आ. समाधान आवताडे यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत

               लक्ष्मी दहिवडी येथे अनेकांच्या घरावर पत्रे उडून गेले आहेत तसेच शिंगाडे वस्ती येथे शेड वरील पत्रे उडून गुरांच्या अंगावर पडल्याने या भागातील बारा जनावरे जखमी झाले आहेत तसेच गावातील फळबागा जुने झाडे उन्मळून पडले आहेत गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे गावठाण व वाड्यावर त्यावरील सुमारे 25 पोल उखडून पडले आहेत 40जणांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत ममदाबाद शेटफळ येथे रामचंद्र म्हमाने यांच्या दोन दोन गाईंच्या अंगावर विजेची तार तुटून पडल्याने विजेचा शॉक लागून दोन जनावरे मृत पावले आहेत त्यांचे 40हजाराचे नुकसान झाले प्रसंगावधान राखून वीजपुरवठा बंद केल्याने बाकी जनावरे सुरक्षित राहिली. तसेच येथील दोघांच्या चार चाकी गाडीवर पत्रे व झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे.महसूल विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. दरम्यान दोन्ही गावाचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने महावितरण कडून तातडीने पोल व तारा ओढण्याचे काम सुरू केले असून महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दिनांक 28 रोजी म्हाळू नामदेव मासाळ (रा.सलगर खुु॥), श्रीमंत चंदू कांबळे (रा.लवंगी रोहिदास वाडी),भुजंगा निंगाप्पा बाबर (रा.लवंगी),भिमराव कोपा सोनवणे (रा.सलगर बु॥) आदींच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने ते बेघर झाले असून त्यांचा संसार या नैसर्गिक घटनेमुळे उघड्यावर आला आहे.                     

            ऐन उन्हाळ्यात अवकाळी मुळे घरावरील पत्रे उडून गेल्याने गोरगरिबांना आपले संसार उघड्यावर थाटावे लागत आहेत. तसेच प्रसंगी उपाशी राहून जोपासलेल्या जनावरांना दुखापत झाल्याने पशुधन जगवणे अवघड झाले आहे.पंचनामे झाले तरी मदत मिळेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी अडचणीत येत आहे.

         

 

 

 दरम्यान तहसीलदार मदन जाधव यांनी दहिवडी येथे जावून नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी केली असून  तलाठ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेवून शासकीय मदत देण्याबाबत आश्वासन  यावेळी नागरिकांना दिले 

        

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More