Take a fresh look at your lifestyle.

आवताडे शुगरकडून 22-23 हंगामातील 2350प्रमाणे सर्व ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा -चेअरमन संजय आवताडे

368

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी :

            आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. लि. नंदुर. या साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२२- २३ मध्ये गळीतास आणलेल्या उसाचे सर्व बिल 2350प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी दिली आहे.

             पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेला हा साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालविला आहे शेतकरी व ऊस उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवून हे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. जिल्ह्यातील खाजगी कारखानदारी मध्ये आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. या साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना 2350 रुपये उच्चांकी दर दिला असुन वाहतूक ठेकेदार यांची उर्वरित बिले हि चालू आठवड्यात पुर्ण आदा केली जातील.चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी अनुभवाच्या जोरावर कारखाना प्रशासनातील मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे यांचे कामाचा कुशल अनुभवाचा जोरावर, अधिकारी व कर्मचारी यांच्या कुशल कामगिरीने कारखान्याने पहिल्याच हंगामात चार लाख तीन हजार मे. टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे.

       पुढील हंगामात ही असेच विक्रमी ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा जास्तीत जास्त मोबदला देण्याचा आमचा टीमचा प्रयत्न असेल असे चेअरमन संजय आवताडे यांनी बोलताना सांगितले .

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More