खा. शरदचंद्र पवार यांचे सामान्य कार्यकर्त्यावरील प्रेम पुन्हा एकदा झाले सिद्ध
लतिफभाई तांबोळी यांना फोनद्वारे दिल्या रमजान ईद च्या शुभेच्छा,ऑडिओ क्लिप होतेय व्हायरल
मंगळवेढा संभाजी नागणे
देशाचे नेते असलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब व राष्ट्रवादीवर निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांवर देखील तेवढेच प्रेम पवार साहेब ही करतात. अनेक वेळा दिसून आले आहे कार्यकर्ता कोणत्या जातीचा जमातीचा हे न पाहता त्याला आपला मानतात व त्याच्या सुख दुःखात सहभागी होतात त्याचीच प्रचिती आज मंगळवेढ्यातील लतीफ तांबोळी यांना आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिलेले मरवड्याचे तांबोळी यांना खुद्द खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सकाळी फोन करून रमजान ईद च्या शुभेच्छा देत कुटुंबाला आणि सर्व समाजाला देखील शुभेच्छा दिल्याने एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले लतिफ तांबोळी यांचे उर भरून आलं आहे.
याबाबतचीऑडिओ क्लिप सोशल मीडियावर फिरत असून सातत्याने कामात व्यस्त असणाऱ्या पवार साहेबांनी एका मुस्लिम सर्वसामान्य कार्यकर्त्याला फोन केल्याने कौतुकाचा विषय झाला आहे. मरवड्याचे लतीफ भाई तांबोळी एकेकाळी अंडी विकून आपला चरितार्थ चालवत होते. आपल्या वक्तृत्व कौशल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून राजकारणात सक्रिय राहिलेले लतीफ भाई यांनी गावचे सरपंचपद,पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्यालय सचिव, तसेच सध्या पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत तसेच त्यांनी पक्ष निरीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
जिल्ह्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते येतात तेव्हा त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे लतीफ भाई कडे असते. लतीफ भाईनी गेली अनेक वर्षे खा. शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वावर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवून काम करीत आहेत. त्यांच्या या निष्ठेमुळे खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वी लतीफ भाई तांबोळी यांच्या मुलीच्या लग्नासाठी मरवडे येथे सपत्नीक आले होते. पवार साहेब एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाला सपत्नीक जाणे लतिफ भाई साठी भाग्याची गोष्ट आहे. एखाद्या कार्यकर्त्याच्या आयुष्यात वरिष्ठ नेत्याने त्यांच्या कौटुंबिक समारंभात सहभागी होणे ही मोठी आनंदाची बाब असते पवार साहेबांनी वेळात वेळ काढून मुस्लिम कार्यकर्ता असलेल्या लतीफ भाई सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित दर्शवीत कार्यकर्त्यावरील प्रेम दाखवून दिले.
रमजान ईद हा मुस्लिम समाजाचा आनंदाचा सण या सणाच्या निमित्ताने अनेक हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत असतात. खा. पवार साहेब हे देशाचा कारभार पाहत असताना देखील आज रमजान ईद च्या निमित्ताने सर्वसामान्य मुस्लिम कार्यकर्ता असलेल्या लतीफ भाई तांबोळी यांना आवर्जून फोन करून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच कुटुंबाला व सर्व समाजाला देखील शुभेच्छा देऊन कार्य कार्यकर्त्या प्रति असलेले प्रेम त्यांनी पुन्हा दाखवून दिले. या याची ऑडिओ क्लिप सर्व सोशल मीडियावर फिरत असून खा. पवार साहेबांनी या रमजान ईद निमित्ताने कार्यकर्त्याला फोन करून शुभेछा देवून लतिफ भाई तांबोळी व त्यांच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित केला आहे.

