एकीचे बळ, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती आवताडे गटाच्या 13जागा बिनविरोध
5जागांसाठी 9जण रिंगणात आवताडे कपबशी तर विरोधी गटाला विमान चिन्ह
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे व आ समधान आवताडे यांच्या गटाच्या13 जागा बिनविरोध झाल्या असून 5जागांसाठी 9उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
समविचारी आघाडीने आपले सर्व अर्ज माघारी घेतल्याचे जाहीर केले असले तरी त्यांच्या समर्थकांनी तीन ठिकाणी आपले अर्ज कायम ठेवल्याने 5जागांसाठी निवडणूक होत आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे व आमदार समाधान आवताडे हे दोघे एकत्र आले आहेत.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे गटाची सत्ता आहे. निवडणुकीसाठी18जगांसाठी 144अर्ज दाखल झाले होते पैकी 10 बाद झाले होते दिनांक 20अखेर 112जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत.
सोसायटी मतदार संघातून बिनविरोध झालेले सदस्य – विष्णुपंत अवताडे, सिद्धेश्वर अवताडे, सुशील अवताडे, नानासो चोपडे,मनोज चव्हाण प्रकाश जुंदळे,धनंजय पाटील.ओबीसी प्रवर्गातून बिराप्पा माळी,एन टी प्रवर्गातून सहदेव लवटे बिनविरोध निवडून आले आहेत.आर्थिक दुर्बल गटातून आनंद हर्षराज बिले,व्यापारी मतदार संघातून बबनराव आवताडे,बसवंत माळी,हमाल तोलार मतदार संघातून प्रवीण कोंडूभैरी हे बिनविरोध निवडून आले आहेत.सोसायटी महिला मतदारसंघातून दोन जागेसाठी तीन अर्ज राहिले असून सविता यादव,कविता बेदरे संगीता कट्टे यांच्यात लढत होणार आहे.ग्रामपंचायत सर्वसाधारण गटा मध्ये दोन जागेसाठी तीन अर्ज राहिले असून जगन्नाथ रेवे, गंगाधर काकणकी, सोमनाथ माळी अशी लढत होत आहे. मागासवर्गीय गटातून एका जागेसाठी तीन अर्ज राहिले असून पांडुरंग कांबळे हौसाप्पा शेवडे, वैभव सोनवले अशी लढत होत आहे.
अर्ज माघारी काढण्याच्या अखेरच्या दिवशी समविचारी आघाडीने नेतेमंडळी व उमेदवारांची बैठक घेत सर्व आर्ज माघारी घेण्याचे ठरविले त्याप्रमाणे बऱ्यापैकी सर्व अर्ज माघारी घेण्यात आले परंतु समविचारीला माणनारे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व मिस्टर नगराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी मात्र आपला अर्ज कायम ठेवला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा संगीता कट्टे,भाजपाचे पदाधिकारी असलेले हौसापा शेवडे यांनी ही आपला अर्ज कायम ठेवला आहे. विरोधी गटाचे केवळ चार अर्ज राहिल्याने ही निवडणूक लागली आहे. दिनांक 21रोजी आव ताडे गटाच्या उमेदवारांना कपबशी तर विरोधी गटाच्या उमेदवारांना विमान हे चिन्ह मिळाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री गावडे तर सहाय्यक म्हणून श्री निंबोले काम पहात आहेत.

