चूक टोलनाका व एस टी प्रशासनाची, त्रास प्रवाशांना
आ. समाधान आवताडे यांच्या सतर्कतेमुळे टोलनाक्यावर अडकलेल्या प्रवाशांची सुटका
मंगळवेढा प्रतिनिधी
इजगाव (ता. मोहोळ) टोल नाका येथे एसटी महामंडळाच्या गाड्यावरील फास्ट टॅग स्कॅनिंग न झाल्यामुळे टोल नाका प्रशासनाने उद्दामपणाने वागत तब्बल सहा ते सात एस टी बसेस दोन तास अडवून ठेवल्यामुळे एसटीतील सुमारे दीडशे ते दोनशे प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागला.त्यातील एका त्रस्त प्रवाशाने आ. समाधान आवताडे यांना फोन लावून याबाबतची माहिती देत विनाकारण प्रवाशांना अडकून पाडल्याचे सांगितले. त्यानंतर आ अवताडे यांनी तातडीने स्विय सहाय्यक रावसाहेब फटे यांना या घटनेची कल्पना दिल्यानंतर फटे यांनी टोलनाका मॅनेजरशी संपर्क साधत तातडीने एस टी बसेस सोडण्याची मागणी करत फास्टटॅग वर बॅलन्स असताना फास्ट टॅग स्कॅनिंग होत नाही ही टोल नाका प्रशासनाची चूक असल्याचे निदर्शनास आणून देत प्रवाशांचे हाल करू नका तातडीने बसेस सोडून प्रवाशांना पुढे मार्गस्थ होऊ द्या असे सांगितल्यानंतर टोल साठी अडवून ठेवलेल्या गाड्या सोडण्यात आल्या. आ. अवताडे संपर्क कार्यालयाकडून प्रवाशांच्या मागणीची तातडीने दखल घेतल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर मंगळवेढा या नवीन झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर इजगाव येथे टोल नाका आहे. दर महिन्याला मंगळवेढा एसटी आगराकडून या टोल नाक्यावर सुमारे पाच लाखाचा टोल दिला जातो. या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या एसटी बसेस फास्ट टॅग ची सुविधा आहे. आज दिनांक 20 रोजी सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान सोलापूर हून मंगळवेढ्याकडे येणाऱ्या सहा सात एसटी बसेस इजगाव येथील टोल नाक्यावर फास्ट टॅग स्कॅनिंग होत नसल्याने बसेसचा टोल टोलनाका प्रशासनाकडे जमा झाला नाही. त्यामुळे टोल नाका प्रशासनाने एसटी बसेस रोख टोल दिल्याशिवाय जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. चालक- वाहक यांच्याकडून फास्ट टॅग सुविधा असताना आम्ही रोख टोल देणार नाही असे सांगितले.
परंतु टोलनाका प्रशासनाने काहीही झाले तरी टोल दिल्याशिवाय गाड्याच जाऊ दिल्या जाणार नाहीत असे उद्दामपने सांगत एसटी बसेस मध्ये असलेल्या प्रवाशांना तब्बल दोन तास अडकवून ठेवले. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे एसटी बसेस मध्ये उखाड्याचा त्रास देखील मोठ्या प्रमाणात जाणवत होता. त्यामुळे यातील एका प्रवाशाने आ आवताडे यांच्याशी संपर्क साधत त्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आ. अवताडे यांनी रावसाहेब फटे यांना याबाबत कल्पना दिली व प्रवाशांची सुटका करण्यास सांगितले. त्यावर फटे यांनी तातडीने आगार व्यवस्थापक व टोल नाका मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून प्रवाशांची चूक नसताना त्यांचे हाल करू नका, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत अनुचित घटना घडल्यास त्यास तुम्ही जबाबदार रहाल असे सांगत फास्ट टॅग स्कॅनिंग होत नाही ही चूक तुमची असल्याने तातडीने एसटी बसेस सोडून द्याव्यात व प्रवाशांना पुढील मार्गासाठी मार्गस्थ होऊ द्या अशी तंबी दिली. त्यानंतर टोळ नाका प्रशासनाने या बसेस सोडून दिल्या.
तब्बल दोन तास अडकलेल्या प्रवाशांना आ अवताडे यांच्या संपर्क कार्यालयाच्या प्रयत्नामुळे एसटी बसेस टोल नाक्यावरून सोडण्यात आल्याने प्रवाशांना विशेषता महिला व लहान मुलांना दिलासा मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

