‘सरकार परिवार ‘ मंगळवेढा आयोजित ‘सरकार चषक’ साठी डे नाईट क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ
चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, सरपंच जमीर सुतार यांच्या हस्ते झाले उद्घाटन
मंगळवेढा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील क्रीडा स्पर्धांमधून राष्ट्रीय पातळीवर खेळाडू निर्माण व्हावेत असे प्रतिपादन खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी केले.
सरकार परिवार मंगळवेढा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन – २०२३ ” सरकार चषक ” यशवंत मैदान, इंग्लिश स्कूल, मंगळवेढा येथे दिनांक 19पासून सुरू झाली त्या प्रसंगी ते बोलत होते.
या सामन्याचे उद्घाटन श्री संत दामाजीनगर ग्रामपंचायत चे सरपंच जमीरभाई सुतार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सिद्धेश्वर बबनराव आवताडे हे उपस्थित होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक पारितोषिक ४१०३९ हजार व सन्मानचिन्ह व्दितीय पारितोषिक ३१०३९ हजार व सन्मानचिन्ह तृतीय पारितोषिक २१०३९ हजार व सन्मानचिन्ह व अंतीम चतुर्थ पारितोषिक १५०३९ हजार व सन्मानचिन्ह तसेच इतर विविध पारितोषिक देण्यात येणार आहे.सर्व सामने डे-नाईट असून लिग पद्धतीने होणार आहेत.
सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक प्रविण खवतोडे, पोलिस पाटील आनंद रायबान, प्रा.गणेश जोरवर-पाटील,अतुल चव्हाण, सागर वाघमारे, प्रकाश शिंदे, गणेश देवकर, विजय शेंडगे, आनंद माळी, विनोद दत्तु, सागर जाधव, नवनाथ मेटकरी, दादा बुरजे अनेक क्रिकेट प्रेमीसह मान्यवर उपस्थित होते.

