Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढा पोलिसांकडून अवैध गुटखा व वाहतूक करणाऱ्या वाहनासह 42लाखाचा मुद्देमाल जप्त

अन्न व भेसळ विभागाचे गुटखाबंदीकडे दुर्लक्ष

781

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी
        मंगळवेढा शहरातील सांगोला नाका येथे दिनांक 17एप्रिल रोजी पहाटे नाकाबंदी करत निपाणी होऊन सांगोला मार्गे सोलापूरकडे अवैधरीत्या निघालेल्या मालवाहतूक ट्रक एम एच 12एच डी 7876या गाडीतून महाराष्ट्रात बंदी असलेला सुमारे 33 लाख800रुपयाचा हिरा पानमसाला गुटखा व सुगंधी तंबाखू सह 42लाखाचा मुद्देमाल मंगळवेढा पोलिसांनी जप्त केला असून चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

              याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवेढा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निपाणी (कर्नाटक )येथून सांगोला मार्गे मंगळवेढा या मार्गावरून अवैधरीत्या सोलापूर कडे मालवाहतूक करणाऱ्या ट्रक एम एच 12एच डी 7876या गाडीतून महाराष्ट्रात बंदी असलेला अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी सहकाऱ्यासह दिनांक 17 रोजी पहाटे मंगळवेढा शहरात सांगोल नाका येथे नाकाबंदी करून सदर मालट्रक अडवून चालकाकडे विचारणा केली असता त्याने गाडीत गुटखा असल्याचे सांगितले.त्यावेळी
पोलिसांनी गाडी व चालक ताब्यात घेत गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये हिरा पान मसाला पिवळा,निळा सुगंधी तंबाखू निळी,पिवळी अशा विविध प्रकारचे 297 पोती आढळून आली. याची किंमत एकतीस लाख 800इतकी असून वाहनाची किंमत अकरा लाख रुपये इतकी असून 42लाख800 रुपये मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला.               

          याबाबत पोलिसांनी अन्नभेसळ प्रशासनाला माहिती दिली त्यानुसार अन्न व भेसळ प्रशासनाने सदर मालाचा पंचनामा करीत राजू चंद्रकांत होनमाने रा. सादेपूर ता. दक्षिण सोलापूर,सोमनाथ पुजारी रा. मंद्रूप ता. दक्षिण सोलापूर, जबीउल्ला सय्यद उर्फ रोशन, रफिक उर्फ रसूल मेमन रा. श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या चौघांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल येलपले हे करीत आहेत.         

           सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने व त्यांचे सहकारी पीएसआय धापटे, सपोनी प्रकाश भुजबळ,पो हे कॉ दत्तात्रय येलपले, दयानंद हेंबाडे ,पो ना सुनिल मोरे,तलवार, वैभव घायाळ, युवराज वाघमारे यांनी ही कारवाई केली आहे. मंगळवेढा पोलिसांकडून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या विरोधात वारंवार कारवाई होत असताना सुद्धा या भागातून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे याबाबत अन्न व भेसळ विभाग नेमके काय करीत आहे असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More