गुरुजी चषक2023 पर्व 2 रे भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या गुरु क्रिकेट क्लब विजेता
माजी उप नगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
मंगळवेढा प्रतिनिधी
माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांच्या 41व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुरुजी चषक2023 पर्व 2 रे भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या गुरु क्रिकेट क्लब विजेतेपद पटकावले असून प्रथम क्रमांकाचे 71041 इतके बक्षीस मिळवले आहे
मंगळवेढा येथे दिनांक 4एप्रिल पासून 14एप्रिल गुरुजी चषक 2023 पर्व 2 रे या स्पर्धा पार पडल्या अंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत(दादा)घुले यांच्या 41व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुरुजी चषक भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये 40संघानी सहभाग नोंदवला होता.
अंतिम विजेते पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक-गुरु cc सोलापूर रक्कम 71041 आणि ट्रॉपी,
द्वितीय क्रमांक-सम्राट सरकार रक्कम 51041 आणि ट्रॉपी,
तृतीय क्रमांक-सांगोला चिनके रक्कम 31041 आणि ट्रॉपी,
चतुर्थ क्रमांक-पंढरपूर GS रक्कम 21041 आणि ट्रॉपी असे पारितोषिक देण्यात आले . बक्षीस वितरण समारंभ उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, मनीष मर्दा अड. राजू शेख वकील यांच्या उपस्थिती मध्ये इंग्लिश स्कुल,यशवंत मैदानावर पार पडला.या स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी मंगळवेढा टायगर्स बचत गट आणि जगदंब बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

