सिध्दापुर येथील भीमा नदीत परराज्यातील चौघांचा एकाच वेळी पाण्यात बुडून मृत्यू
पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यात यश
मंगळवेढा प्रतिनिधी
गेल्या गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी सिद्धापूर ता मंगळवेढा येथे पोटापाण्यासाठी गोरखा म्हणून आलेल्या एका कुटुंबातील एक मुलगा एक मुलगी व दोन महिला यांचा भीमानदी त बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक १३ रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.
गेल्या आठ दिवसा खाली सिधापुर येथे बाहेरून दोन पुरुष दोन महिला व एक लहान मुलगा व एक लहान मुलगी असे एक कुटुंब आले होते.यातील पुरुषमंडळी रात्रीच्या वेळी ते गोरखा म्हणून काम करत होते आज दुपारी एकच्या सुमारास दोन महिला व त्यांची दोन मुले येथील शाळेच्या पाठीमागे कपडे धुण्यासाठी भीमा नदीत गेल्या होत्या त्या महिलांचे कपडे धुण्याचे झाले असताना ती दोन मुले पाण्यात पोहत असताना अचानकपणे त्या खोल खड्ड्यात पडल्याने बुडू लागले त्यावेळी त्या दोन महिला त्याना वाचवण्यासाठी गेल्या असता त्या देखील बुडाल्या.यातील मुलगा 13वर्षाचा मुलगी आठ वर्षाची तर महिला तीस व अडतीस वर्षाच्या असल्याचे समजते
या घटनेची खबर पोलिसांना कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील पो नि रणजित माने हे आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले त्यांनी त्या चार मृत देहांचा तातडीने शोध घेत सायंकाळी सहा पर्यंत चारही मृत देह बाहेर काढले असून शववि्छेदन करण्यासाठी मंगळवेढा येथे आणले आहेत या घटनेची फिर्याद वृत देईपर्यंत दाखल झाली नव्हती. या घटनेमुळे सिद्धापूर गावात शोक काळा पसरली आहे या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांबरोबर गावातील युवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या परराज्यातील कुटुंबावर ही दुःखद वेळ आल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

