सलगर बु येथील कुस्ती स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड याने पटकाविले 2 लाख 51 हजाराचे पारितोषिक
भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल(दादा) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन
मंगळवेढा प्रतिनिधी
भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन मा.अनिल(दादा) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सलगर बु येथे आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड व पंजाबचे पै. भोला पंजाब यांच्यात झालेल्या अटीतटी च्या लढतीत पै महेंद्र गायकवाड यांनी 2 लाख 51 हजार रुपयांचे पहिले पारितोषिक पटकावले.
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल(दादा) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील सलगर(बु) येथे भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस उपमहाराष्ट्र केसरी पै महेंद्र गायकवाड यांनी दोन लाख एककावण हजार रुपयांचे पहिले पारितोषिक पटकावले. तर दोन नंबरला पै.संतोष जगताप व पै.संदेश ठाकुर यांच्यात लढत झाली यामध्ये पै.संतोष जगताप यांनी दोन लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.यावेळी शंभर पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या पैलवानांच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. या भागामध्ये प्रथमच भव्य दिव्य असे कुस्ती स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते.
दरम्यान कुस्ती स्पर्धेपूर्वी अनिल(दादा) सावंत यांची सावंत प्रेमीनी सलगर गावातून मिरवणूक काढली व त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे आयोजन मा.अनिल(दादा) सावंत मित्र मंडळ यांनी केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन तथा शिवसेनेचे सोलपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत सर यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी व्हाईस चेअरमन अनिल(दादा) सावंत व डॉ.आदित्य सावंत, बसवराज पाटील, राजू पाटील, दत्ता सावंत, प्रशांत भोसले, महाराष्ट्र केसरी अर्जुन पवार, पै.शंकर पुजारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.महेंद्र देवकाते, पै.वाकडे, ,पै.घुले आदींनी पंच म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सलगरचे माजी सरपंच रामचंद्र जाधव, चंद्रकांत देवकर गुरुजी, तानाजी चव्हाण, इंद्रजीत पवार व अशोक निकम यांनी केले होते.
यावेळी आप्पा माने सरकार, तानाजी काकडे, गेना दोलतडे, दादा दोलतडे, गुलाब थोरबोले, मच्छिंद्र खताळ, होळकर यांच्यासह यावेळी सलगर व मंगळवेढा तालुक्यातील असंख्य कुस्तीप्रेमी खेळाडू, भैरवनाथ शुगरचे कर्मचारी व पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन धनाजी मदणे व दामोदर घुले यांनी केले.

