Take a fresh look at your lifestyle.

अपंगाचे धान्य रेशन दुकानदाराने ढापले, दुकानदारावर कारवाईची प्रहारची मागणी

पुरवठा खात्याचा सावळा गोंधळ

1,237

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
        मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी येथील दिव्यांग बांधवांच्या नावावर आलेला रेशनिंग चा माल त्या दिव्यांग बांधवाला न देता त्याचा अंगठ्याचा ठसा घेऊन रेशन दुकानदाराने ढापल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्या दुकानदारावर कारवाई करण्याचे आश्वासन पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान पुरवठा खात्याच्या सावळ्या गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा विभाग सांभाळून घेत असल्याने असे प्रकार वाढीस लागले आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांना धान्य वेळेत मिळण्याबाबत काळजी घेण्याची मागणी होत आहे.
       याबाबत अधिक माहिती अशी
मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी येथील दिव्यांग बांधवांच्या नावावर आलेला रेशनिंग चा माल दिव्यांग बांधव आणण्यासाठी गेला होता परंतु दुकानदाराने त्याचा अंगठ्याचा ठसा घेऊन त्याला रेशन न देता माघारी पाठवले आणि तुझा आर सी नंबर आला नाही, आर सी नंबर येऊ दे मग तुला रेशन देतो असे सांगितले आहे. त्यावेळी त्या दिव्यांग बांधवाने लगेच याबाबत प्रहार चे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी ही घटना आ बच्चू कडू यांच्या कानावर घातले लगेच त्यांनी त्याचा पाठपुरावा करा त्या बांधवाला न्याय मिळवून द्या असे सांगितले नंतर प्रहारकडून याबाबत पाठपुरावा सुरू केला. कार्यकर्त्यांनी ऑनलाईन माहिती चेक केली व मार्च महिन्याचा माल मशीन वर उचलला असे स्पष्ट दिसू लागले लगेच प्रहार चे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी मंगळवेढा तहसील कार्यालय गाठले व त्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले यावेळी त्या रेशन दुकानदाराच्या विरोधात पुरावे दाखवले व त्या दुकानावर कारवाईची करावी असे निवेदन दिले.

           निवेदन देतेवेळी मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे ,कमल ठेंगील, गणेश दत्तू, सतीश ठेंगील, विशाल गायकवाड उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे,पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील, पुरवठा अधिकारी गायकवाड साहेब ,पुरवठा लिपिक शिवाजी भोसले हजर होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यानी त्या दुकानदारावर कारवाई करू व दिव्यांगाना न्याय देऊ असे सांगितले. परंतु प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी जर संबंधितावर कारवाई नाही झाली तर त्या दुकानदाराच्या विरोधात मंगळवेढा तहसील कार्यालय समोर बोंबाबोंब आंदोलन प्रहार कडुन करू असा इशारा दिला आहे. दरम्यान पुरवठा खात्याकडे प्रहार संघटनेने उपस्थित राहून निवेदन दिले असताना येथील पुरवठा अधिकारी मात्र आपणाकडे अजून निवेदन आले नसल्याचे सांगत वेळ मारून नेऊन संबंधित दुकानदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार तर करत नाहीत ना असा सवाल उपस्थित होत आहे या तक्रारी संदर्भात पुरवठा अधिकारी हनुमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याकडे अजून तक्रार आली नाही प्रहार संघटनेने त्यांची तक्रार टपालाद्वारे दिली आहे . तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित घटनेची चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More