मंगळवेढा प्रतिनिधी
संत दामाजी नगर येथील ग्रामपंचायत मालकीचा असलेला प्रभाग क्रमांक एक मधील नाथपंथी समाज ते सावंत प्लॉट,(नागेश्वरी नगर) हा रस्ता गेल्या तीन वर्षापासून अडवलेला होता. याबाबत संबंधित व्यक्तींना ग्रामपंचायतीकडून रस्ता खुला करण्याबाबत वारंवार कळविण्यात आले होते परंतु हा रस्ता खुला झाला नव्हता त्यामुळे येथील खरेदी विक्री संघाचे चेअरमन व दामाजीचे संचालक सिद्धेश्वर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत दामाजी नगर यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन येथील अडथळा दूर करत नागरिकांसाठी रस्ता खुला करण्यात आला.
यावेळी तलाठी समाधान वगरे, ग्रामसेवक अरुण मोरे, पोलीस हवालदार पठाण, पोलीस नाईक दुधाळ, महिला पोलीस सुनीता चौरे, सरपंच जमीर सुतार, सदस्य लक्ष्मण गायकवाड, अण्णासाहेब आसबे, मालाबाई बाबर, उमेश ढगे यांच्यासह लक्ष्मण बाबर, करण बाबर, संजय बाबर, अर्जुन सेगर, तानाजी जावळे, विनोद पतेर, कय्युम सुतार, सुभाष बाबर, सुरेश बाबर, आदी नागरिक उपस्थित होते हा रस्ता खुला झाल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून नागरिकांची वाहतुकीसाठी होणारी गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

