Take a fresh look at your lifestyle.

फुले दांपत्यामुळे सर्वसामान्यांना शैक्षणिक दारे खुली – आ समाधान आवताडे

410

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे खुली झाली. प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी हाल अपेष्टा सोसत शैक्षणिक, सामाजिक चळवळ उभी करून समाजाला उभारण्याचे मोलाचे कार्य केल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथे व्यक्त केले.
            मंगळवेढा भाजपा कार्यालयात ओबीसी मोर्च्या च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले याची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

        यावेळी भाजपचे संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष गौरूदादा बुरकुल,भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस अड बापूसाहेब मेटकरी, युवा मोर्चा संघटनमंत्री सुदर्शन यादव, ओबीसी युवा मोर्चा आदित्य हिंदुस्तानी,सुशांत हजारे,ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, अजित लेंडवे, विजय आकळे, बापू डोंगरे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More