मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील जिजामाता महिला नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात 7कोटी 91लाख71 हजार 585 इतका नफा झाल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा आशाताई रामकृष्ण नागणे यांनी दिली.
जिजामाता महिला पतसंस्था ही गेल्या 38 वर्षापासून कार्यरत असून संस्थेला कायम अ वर्ग मिळाला आहे. जिजामाता परिवाराचे नेते,माजी नगरसेवक व दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक रामकृष्ण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने भरारी घेतली असून जिल्ह्यात आदर्श संस्था म्हणून गणली जाते.ही महिलांची पहिली पतसंस्था आहे. संस्थेकडे अहवाल सालात 157 कोटी 98 लाख रुपये इतक्या ठेवी जमा असून संस्थेने 92 कोटी 55 लाख इतक्या रकमेची गुंतवणूक केली आहे. संस्थेने 117 कोटी 98 लाख रुपये कर्ज वाटप केले असून जिल्ह्यातील गरजू सभासद, महिला,व्यवसायिक बेरोजगार युवक, यांना कर्ज वाटप केले आहे.
संस्थेची आर्थिक उलाढाल 229कोटी 84लाख असून संस्थेचे 4028 इतके सभासद आहेत.सभासदांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास संस्थेने मोठी मदत केली आहे संस्थेने स्थापनेपासून सतत संस्था अ वर्गात आहे. संस्थेची स्वतःच्या मालकीची तीन मजली इमारत असून संस्थेचे सर्व कामकाज संगणकीय आहे. संस्थेचे सभासद, ग्राहक, ठेवीदाराना आपुलकीच्या नात्याने संपूर्ण सोयीसवलती दिल्या जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये विश्वासार्थ निर्माण केलेली पतसंस्था म्हणून ओळखले जाते.संस्थेचे सर्व संचालक मंडळ,अधिकारी,कर्मचारी यांच्या सहकार्याने भविष्यात देखील सभासद कर्जदार व ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेऊन चांगल्या पद्धतीने व काटकसरीने संस्था चालून नावारूपाला आणली जाईल असे चेअरमन आशाताई नागणे यांनी सांगितले.

