आठ दिवसात शेतकऱ्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करा- आ समाधान आवताडे
महावितरणच्या बैठकीत शेतकऱ्यांकडून तक्रारींचा पाऊस
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
मंगळवेढा पंढरपूर तालुक्यात राज्य शासनाकडून महावितरण ची कामे करण्यासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून देखील कामे संथ गतीने सुरू आहेत ही कामे तातडीने सुरू करावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी अर्जाद्वारे मांडल्या आहेत त्या तक्रारींचे आठ दिवसात निराकरण करण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील महावितरण संबंधित शेतकऱ्यांच्या असणाऱ्या विजेच्या अडचणी संदर्भात मंगळवेढा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित बैठक प्रसंगी ते बोलत होते यावेळी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, महापारेषन चे कार्यकारी अभियंता शेळके कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे,भाजपा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,बाजार समिती सभापती सोमनाथ अवताडे, प्रदीप खांडेकर, राजन पाटील, धनंजय पाटील, अशोक केदार,सुरेश भाकरे, समाधान हेंबाडे, सुदर्शन यादव, नंदू जाधव, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, सरचिटणीस बापूसाहेब मेटकरी, तालुकाध्यक्ष धनाजी गडदे,उपकार्यकारी अभियंता बाळू चोरमले, प्रकाश पाटील, शाखा अभियंता यशवंत दिघे महेश संदीप माळी,दत्तात्रय आसबे जयदीप भंडारे, सचिन कोळेकर रावसाहेब फटे, प्रवीण घोंगडे आदी उपस्थित होते.
या बैठकीच्या वेळी प्रामुख्याने जळालेले डीपी लवकर मिळत नाहीत, तुटलेल्या तारा जोडल्या जात नाहीत, मंजूर झालेले डीपी उभारण्यास विलंब लागतो, डीपिडीसी च्या निधीतून डीपी मिळावे, महावितरण आपल्या दारी योजनेत कनेक्शन भरलेल्या शेतकऱ्यांना पोल टाकून वीज कनेक्शन देण्यात यावीत, डीपीडीसीमधून मंजूर झालेल्या डीपीची उभारणी तात्काळ करावी प्रलंबित वीज कनेक्शन लवकर मिळावे, सध्या तालुक्यात अनेक भागात शेतीपंपाची चारच तास लाईट मिळत असून तीही अपुऱ्या दाबाने व वारंवार खंडित पद्धतीने मिळत आहे ती सुरळीत करावी अशा स्वरूपाच्या तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या तसेच काही भागात वायरमन लोकांकडून शेतकऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी देखील यावेळी झाल्या.
यावेळी बोलताना आमदार अवताडे म्हणाले राज्य शासनाकडून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील विजेची अडचण दूर होऊन शेतकऱ्यांना अखंडित व योग्य दाबाने वीज पुरवठा व्हावा यासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आहे हा मंजूर झालेला निधी योग्य पद्धतीने खर्च करून नवीन डीपी उभा करणे, शेतकऱ्यांना एल टी एच टी लाईन टाकून देण्याची कामे तातडीने करून द्यावीत.
भाळवणी हुन्नूर लिंक लाईनचे टेंडर त्वरित काढावे, नंदुर, लक्ष्मी दहिवडी येथील नव्याने होणारे सब स्टेशन चे काम व सिद्धापूर येथील राहिलेले काम तातडीने सुरू करावे तसेच शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे वीज जोडणी देण्यासाठी आराखडा बनवा, जे ठेकेदार वेळेत काम करत नाही त्यांची कामे काढून घ्या. चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी असे सांगितले यावेळी त्यांनी बैठकीत महवितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत कारभार सुधारण्याच्या सूचना दिल्या. तसेच आज आलेल्या तक्रारी वर कार्यवाही करून येत्या आठ दिवसात संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या कामाबाबत पूर्तता करावी अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी महावितरणचे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी डीपीडीसी च्या निधीतून डीपी उभारणीचे काम महिना अखेर पर्यंत पूर्ण केले जाईल तसेच वीज मागणीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत तसेच मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेत ज्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवर सोलर उभा करावयाचे आहेत त्यांनी महावितरण ची संपर्क साधावा या योजनेतून जमीन करार पद्धतीने देणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये भाडे मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर चौकशी करून कारवाई केली जाईल अशी त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या अनेक दिवसापासून महावितरणच्या संदर्भात अशी बैठक झाली नव्हती या बैठकीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवत महावितरणच्या कारभाराविषयी तक्रारींचा पाऊस पडला.

