Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, घरफोडी व मोटरसायकल चोरीचे चौदा गुन्हे उघडकीस,

दोन आरोपी अटकेत, साडे तेरा लाख किमतीचे 25तोळे सोने व 2मोटर सायकली जप्त

1,529

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

         मंगळवेढा शहरांमध्ये गेल्या तीन महिन्यापासून तब्बल बारा घरफोडी व दोन मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील 25तोळे सोन्याचे दागिने व दोन मोटर सायकली असा साडे तेरा लाख रुपये चा मुद्देमाल मंगळवेढा पोलिसांनी जप्त केला असून स्थानिक दोन आरोपींना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे व मंगळवेढा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

              या घटनेतील आरोपी प्रदीप धनाजी हेंबाडे रा. ढवळस रोड मंगळवेढा आणि अजित बिरू मेटकरी रा धर्मगाव रोड मंगळवेढा अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.जानेवारी महिन्यापासून सकाळी सहा ते आठच्या दरम्यान शिक्षक कॉलनी, मित्र नगर, वनराई कॉलनी सप्तशृंगी नगर, नागणेवाडी चैतन्य कॉलनी, बनशंकरी कॉलनी व तसेच ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी भर दिवसा घरपोडीची सत्र सुरूच होते.सदरच्या घरफोडी तपासासाठी पोलीस निरीक्षक रणजीत माने व त्यांच्या टीमने अतिशय कसोशीने प्रयत्न केले. परंतु रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे ,नाकाबंदी करणे ,तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करणे, सांगोला पंढरपूर मोहोळ अक्कलकोट सोलापूर शहर तसेच महाराष्ट्रातील व परराज्यातील गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला होता.मात्र काही एक सुगावा लागला नाही.
              परंतु स्थानिक गुन्हेगारांकडे लक्ष देऊन गोपनीय बातमी दारामार्फत मिळणारी माहिती यांच्या आधारे या दोन संशयित व्यक्तींची नावे मिळाली. त्या दोन संशयित व्यक्तींचा गुप्तपणे अभ्यास चालू ठेवून त्यांच्या रोजच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून त्यांची माहिती काढली. त्यातून सदरच्या घरफोडी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे याच दोघांनी केल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता चौदा गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व दोन मोटर सायकली जप्त करण्यात आल्या असून इतर चोरीचा तपास केला जात आहे

                  सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, विभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप आणि गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, सपोनी अंकुश वाघमोडे, सपोनी सत्यजित आवटे, पोहेकॉ दयानंद हेंबाडे, हजरत पठाण, सुनील मोरे, अजित मिसाळ, अजित शिंदे, खंडाप्पा हाताळे, कैलास खटकाळे युसुफ पठाण यांनी केली आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More