Take a fresh look at your lifestyle.

आ. समाधान आवताडे यांनी बोलावली महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक

शेतकऱ्यांच्या विजेच्या अडचणी संदर्भात होणार चर्चा

293

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मंगळवेढा विभाग येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांच्या विजेच्या  अडचणी व महावितरण च्या कामासंदर्भात शुक्रवार दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सार्वजनिक बांधकाम विश्राम मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांनी संयुक्त बैठक बोलवली आहे.

         पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यानंतर लवकर न करणे, वेळेत न बसविणे शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणे वीजपुरवठा वारंवार खंडित होणे यासह शेतकऱ्यांच्या  विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आमदार आवताडे यांनी ही बैठक बोलावली आहे.

       सदर बैठकीच्या अनुषंगाने मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांच्या विजेसंदर्भात अडीअडचणी अथवा समस्या असतील अशा शेतकऱ्यांनी आपल्या समस्या व अडीअडचणी लेखी स्वरूपात गुरुवार सायंकाळपर्यंत आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा व पंढरपूर येथे जमा करावेत असे आवाहन  कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

             या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सोलापूर मंडळ कार्यालय सोलापूरचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता उपअभियंता तसेच संबंधित विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर इत्यादी अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यासाठी आमदार कार्यालयाकडून पत्राद्वारे आदेशित करण्यात आले आहे. मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वीजेसंबंधी असणाऱ्या विविध प्रश्नांचा आमदार आवताडे आढावा घेणार घेऊन आवश्यक कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांना आदेश देणार आहेत. तालुक्यात सद्या आ समाधान आवताडे यांनी विजेच्या अडचणी सोडवण्यासाठी कोट्यवधीचा निधी आणला असून त्या निधीतून मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून यामध्ये शेतकऱ्यांना अडचणी येवू नयेत तसेच अजून नवीन डीपी,वीज कनेक्शन, दुरुस्ती जळालेले डी पी वेळेवर मिळणे याबाबत  चर्चा होणार असून शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More