Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढ्यात नगरपालिका शिक्षकाची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

3,882

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा येथील रामचंद्र सेवू राठोड वय 47 या शिक्षकाने अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेची फिर्याद मयताचा भाऊ लिंबाजी शिवाजी राठोड (वय 52) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे.
अधिक माहिती अशी की आज दि.28 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजण्यापुर्वी फिर्यादीचा लहान भाऊ रामचंद्र शेऊ राठोड याने मंगळवेढा येथील बनशंकरी कॉलनी येथे अज्ञात कारणाने त्याचे रहाते घरातील बेडरुम मधील पंख्याला  साडीच्या साहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मयत रामचंद्र राठोड हे मंगळवेढा नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, विवाहित मुलगी व भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास मंगळवेढा पोलीस करीत आहेत.

 

 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More