Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढा बाजार समिती निवडणुक रंगणार

ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे गटाकडून अर्ज दाखल, आ. समाधान आवताडे यांचे तयारीला लागण्याचे कार्यकर्त्यांनाआदेश समविचारी आघाडीची 30 ला बैठक

641

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

          मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून निवडणूक रंगतदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सत्ताधारी गटाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांनी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी आपला व्यापारी मतदार संघातून अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे आ समाधान आवताडे यांनी सुत मिल वर कार्यकर्त्यांची बैठक घेत कार्यकर्त्यांना तुम्ही म्हणाल तसे असे सांगत अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर समविचारी आघाडीने निवडणुकीच्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक दिनांक ३०मार्च रोजी बैठक बोलावली आहे.
                मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित जोपासनारी संस्था म्हणून कृषी उत्पन्न समितीकडे पाहिले जाते. या संस्थेवर गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांचे वर्चस्व आहे त्यांच्या काळात त्यांनी व्यापारी,शेतकरी यांच्या अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपले पुतणे सोमनाथ आवताडे यांना काम करण्याची संधी दिली होती त्यांनी देखील उत्कृष्ट काम करीत बेस्ट सभापतीचा मान मिळवला आहे.परंतु गेल्या काही दिवसात तालुक्यातील राजकारणात अनेक बदल झाल्याने यावेळी बाजार समितीची निवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

      पहिल्या दिवशी ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे  यांचा अर्ज दाखल –        

दिनांक 27 रोजी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सोळा अर्जांची विक्री झाली असून जणांनी अर्ज भरले आहेत व्यापारी मतदारसंघातून बबनराव बाबुराव अवताडे, सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातून व भटक्या विमुक्त जमाती अशा दोन गटातून नानासाहेब राजाराम चोपडे, हमाल तोलार मतदारसंघातून प्रवीण नंदू कोंडूभैरी असे चार अर्ज दाखल झाले असून दिनांक 3 एप्रिल पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. गावडे यांनी सांगितले.

           

             सत्ताधारी गटाचे ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांचे तालुक्यात सहकार क्षेत्रात वर्चस्व आहे. त्यांनी पहिल्या दिवशी व्यापारी मतदार संघातून आपला अर्ज दाखल केला असून उर्वरित सर्व अर्ज दाखल केले जाणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आ समाधान आवताडे हे देखील आपला गट मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे दि 27रोजी आवताडे स्पिनर्स येथे प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांचे मनोगत व्यक्तिगत रित्या आमदार समाधान आवताडे यांनी जाणून घेतले. व ‘कार्यकर्ते म्हणतील तसे’ अशी भूमिका त्यांनी घेतली असून इच्छुक कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. V कोणत्याही परिस्थितीत बाजार समिती ताब्यात घेण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आमदार अवताडे हेदेखील बाजार समितीच्या निवडणुकीत सक्रिय सहभागी होणार असल्याचे चित्र आहे. दामाजी कारखाना निवडणुकीत तयार झालेल्या समविचारी आघाडीने देखील निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी सुरू केली आहे. त्यांनीदेखील निवडणुकीच्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक दिनांक ३० मार्च रोजी दुपारी १:०० वाजता शिशुविहार मंगळवेढा येथे बैठकीचे आयोजन केले आहे.

           कृषी उत्पन्न बाजार समिती साठी 18 जागांसाठी ही निवडणूक होत असून यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून जनरल 7 महिला राखीव 2 भटक्या विमुक्त जाति अशा एकूण 11 जागा, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण दोन, अनुसूचित जाती जमाती एक, आर्थिक दुर्बल एक अशा एकूण चार, व्यापारी मतदारसंघातून दोन, तर हमाल तोलार मतदारसंघातून एक अशा 18 जागा आहेत. विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे 833 मतदार असून ग्रामपंचायत मतदार संघाचे 565 मतदार संघाचे 230 हमाल तोलार मतदारसंघाचे 31 मतदार आहेत.
            

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More