मंगळवेढा प्रतिनिधी
नंदूर येथे आवताडे शुगर कारखान्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस हे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी निधी जाहीर न करता केवळ सबब सांगत आश्वासनाचे गाजर दाखवले तसेच आ समाधान आवताडे हे उसाचा दर जाहीर करतील या अपेक्षेने आलेल्या शेतकऱ्यांना इतर कारखान्याप्रमाणे आवताडे शुगर दर देईल असे सांगितल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली . तालुक्यासह कर्नाटक सीमेवरील गावातून मोठ्या अपेक्षेने आलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला बरेच शेतकरी फडणवीस यांचे भाषण होण्यापूर्वी कारखाना कार्यस्थळा वरून निघून गेले
गेल्या काही दिवसापासून फबटेक शुगर बंद होता तोआ आवताडे यांनी चालू केला असून त्याचा गाळप शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला सध्या शेतकरी संघटनेने उसाला पहिली उचल २५०० रुपये व अंतिम ३१०० रुपये दर द्यावा यासाठी उग्रपणे आंदोलन सुरू केले आहे दामाजीच्या पराभवानंतर आ समाधान आवताडे यांनी फॅबटेक शुगर घेऊन त्यास आवताडे शुगर असे नाव दिले या कारखान्याची मोळी कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य यांच्या हस्ते घेण्यात आला. तालुक्यात चार कारखान्यात उसासाठी स्पर्धा राहणार असून आवताडे शुगरचा पहिला गळीत हंगाम असल्याने आज उसाचा दर जाहीर केला जाईल या अपेक्षेने मोठ्या संख्येने शेतकरी मेळाव्यास शेतकरी उपस्थित राहिले या कार्यक्रमात प्रास्तविक मध्ये आ आवताडे यांनी केवळ उसाला इतर कारखान्यापेक्षा जादा दर देऊ सांगितले मात्र पहिली उचल व अंतिम दर किती दिला जाईल हे सांगणे टाळले. यामुळे अनेक शेतकरी आ आवताडे यांचे भाषण संपताच दराबाबत शेतकऱ्यांनी मीडिया समोर उघडपणे नाराजी व्यक्त केली . तसेच यापूर्वी फॅबटेक शुगर ने ३०० रुपयेची थकीत ऊस बिले दिली नसल्याची ओरड शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणारा ऊस दरावर आ आवताडे यांनी मौन बाळगल्याने काही शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण न ऐकता कारखाना कार्यस्थळावर वरून जाणे पसंत केले
चौकट–
फडणवीस यांचेकडून मंगळवेढे करा ना आश्वासनाचे गाजर–
दक्षिण भागातील शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न असणाऱ्या २४ गावच्या उपसा सिंचन योजनेस उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात सात दिवसात मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन पुढील आठवड्यात निधीची तरतूद अशी घोषणा केली मात्र दोन महिने यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे फडणवीस हे सरकार स्थापन झाल्यानंतर मंगळवेढा दौऱ्यावर पहिल्यांदा शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहिले त्यामुळे या कार्यक्रमात ते योजनेसाठी निधीची घोषणा करतील अशी उपस्थित शेतकऱ्यांना आशा होती मात्र त्यांनी या योजनेसाठी लागणाऱ्या सिमेंट, स्टील मध्ये मोठी वाढ झाली असून या योजनेचे सुधारित दरसुची नुसार सर्व मान्यता पूर्ण करून मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन असे सांगून या योजनेबाबत निधीची घोषणा करणे टाळत पुन्हा आश्वासनाचे गाजर दाखवल्याने शेतकऱ्यांच्या आशेची निराशा झाली तसेच बसवेश्वर स्मारक, चोखामेळा स्मारक याबाबत देखील आश्वासन दिले फडणवीस यांची भाषण सूरु असताना खा निंबाळकर यांनी चिठ्ठी देत फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाबाबत बोलण्याबाबत सांगितले याबाबत आठ दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगितले परन्तु आ समाधान आवताडे यांनी दिल्ली येथे जाऊन रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन पंढरपूर विजापूर रेल्वे बाबत मागणी केली होती याबाबत मात्र फडणवीस काहीच बोलले नाहीत त्यामुळे पंढरपूर विजापूर रेल्वेमार्गाचे काय अशी चर्चा यावेळी शेतकऱयामधून होत होती तसेच सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत सरकारने शेतकऱ्यासाठी मदतीची भूमिका घेतली असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात मात्र मंगळवेढ्यात वेगळेच चित्र असून नुकसानीच्या पंचनाम्याबाबत अनेक अटी व तालुक्यात नसलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल खात्याकडे आल्याचे सांगण्यात आले आहे याबाबत आ आवताडे यांनी मागणी करून ही फडणवीस यांनी याबाबत बोलण्याचे टाळले

