Take a fresh look at your lifestyle.

आरटीओ ना प्रामाणिकपणे ओव्हरलोड ऊस वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचना द्या:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वाभिमानीची मागणी

248

- Advertisement -

 

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
सध्या मंगळवेढा तालुक्यात ऊस दराच्या आंदोलनामुळे कारखानदारांनी धसका घेतला असला तरी दर मात्र जाहीर करत नाहीत त्यामुळे ऊस वाहतूक थांबवण्या साठी आरटीओ विभागाने ओव्हरलोड ऊस वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी निवेदनाद्वारे केली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व साखर कारखान्याचे ऊस गाळप चालू झालेले आहे सर्व ट्रॅक्टर ट्रक ऊस वाहतूक करीत असताना क्षमतेपेक्षा दुप्पट ऊस वाहतूक करतात यामुळे प्रसंगी त्या ड्रायव्हरचे वाहनावर नियंत्रण राहत नाही अनेक अपघात ऊस गाळप हंगाम मध्ये होतात तसेच ग्रामीण भागामधील रस्ते खराब होऊन तेथील नागरिकांची गैरसोय होते अनेक ट्रॅक्टर ट्रक यांचे पासिंग केलेले नसते इन्शुरन्स भरलेला नसतो अनेक ड्रायव्हर कडे लायसन सुद्धा नसतात यामुळे एखादा अपघात घडल्यास अपघातामध्ये जीव गमावणे जखमी होणे असे अनेक प्रकार घडत असतात यामुळे विमा कंपन्या क्लेम करताना वाहनाची पासिंग आहे का?क्षमते एवढा माल वाहनांमध्ये भरला आहे का? त्या वाहनांचा इन्शुरन्स आहे का? हे तपासले जाते या सर्व गोष्टी अपुरे असल्यास विमा नाकारला जातो प्रसंगी अपघातामध्ये मयत झालेले अथवा जखमी झालेले कुटुंब उघड्यावर येते ऊस वाहतूक करणाऱ्या काही ट्रॉलीला नंबर वेगळा असतो परंतु चुकीच्या नंबर प्लेट सुद्धा लावलेल्या असतात या सर्व घटना वर पारदर्शकपणे कारवाई केल्यास शासनाला दंडाच्या स्वरूपात लाखो रुपयांचा महसूल गोळा होईल आणि दंड गोळा करण्याच्या बाबतीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा राज्यामध्ये पहिला नंबर पण येईल कारण राज्यामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने म्हणून सोलापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो तरी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आरटीओ ना पारदर्शकपणे काम करण्याच्या सक्त सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली

चौकट:- जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक आरटीओ किंवा कर्मचारी कारवाई करण्यासाठी त्यांचे पथक नेमावे अनेक वाहने असल्यामुळे कर्मचारी संख्या अपुरी पडणार आहे यासाठी आरटीओ मित्र म्हणून स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोफत आरटीओन सहकार्य करण्यास तयार आहेत त्यांना ऊस गाळप होईपर्यंत आरटीओ मित्र म्हणून ओळखपत्र द्यावे आरटीओचे कारवाई ही सायंकाळी 4 वाजल्यापासून पहाटे 4 पर्यंत होणे गरजेचे आहे आरटीओ अधिकाऱ्यांनी नुसता कारवाईचा बनाव करू नये

अड राहुल घुले
अध्यक्ष प महाराष्ट्र युवा स्वाभिमानी

ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे वजन बाहेरील काट्यावर केल्यामुळे किती दंड ट्रॅक्टरला किंवा ट्रकला बसवायचा हे कळणार असून कारखान्याचे वजन आणि बाहेरील काट्यावर केलेली वजन यामधील तफावत सुद्धा शेतकऱ्याला समजेल तरी आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रत्येक ट्रॅक्टर चे वजन बाहेरील काट्यावर करावे
-युवराज घुले जिल्हा संघटक

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More