Take a fresh look at your lifestyle.

आवताडे शुगर कडून चार लाख 2हजार 555मे टनाचे गाळप करून हंगाम यशस्वी – चेअरमन संजय आवताडे

आवताडे शुगर अँण्ड डिस्टिलरीजचा प्रथम गळीत हंगाम सांगता समारंभ, कामगारांना पंधरा दिवसाचा बक्षीस पगार -सभापती सोमनाथ आवताडे

402

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी:
               आवताडे शुगरने प्रथम गळीत हंगामामध्ये अल्पावधीत 4 लाख 2 हजार 555 इतके गाळप केले करून 3 लाख 80 हजार 300 पोत्यांचे साखर उत्पादन केले असून आ समाधान आवताडे यांचे कुशल मार्गदर्शनाखाली सर्व शेतकरी, ऊसतोडणी कामगार, वाहतूक ठेकेदार अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामूळे हंगाम यशस्वी झाला असल्याची माहिती आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी दिली.
आवताडे शुगर अँन्ड डिस्टिलरीज चा प्रथम गळीत हंगाम सांगता समारंभ श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, मारापुरचे सरपंच विनायक यादव, कार्यकारी संचालक मोहन पिसे, मुख्य शेती अधिकारी रमेश पवार, संपत अटकळे,उप शेती अधिकारी वसंत लेंढवे, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे , संचालक भारत निकम, तज्ञ संचालक विजय माने, पप्पू काकेकर, नंदूरचे उपसरपंच परमेश्वर येणपे, सतीश पाटील आदि उपस्थित होते.
कृ उ बा समिती सभापती सोमनाथ आवताडे बोलताना म्हणाले, आवताडे शुगरने प्रथम गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडल्याने कामगारांना पंधरा दिवसांचा बक्षिस पगार दिला जाणार आहे अनेक अडचणींचा सामना करत कोणताही राजकीय आकसभाव मनामध्ये न ठेवता सर्व सामान्य शेतकऱ्यांचा ऊस गळीतास आणून शेतकऱ्यांना एकप्रकारे दिलासा देण्याचे काम आवताडे शुगरच्या माध्यमातून झाले आहे. इतर साखर कारखान्यापेक्षा अधिकचा दर देऊन शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्नही आवताडे शुगरच्या माध्यमातून झाला आहे.गळीत हंगाम सुरू असताना कारखाना कार्यस्थळावर आरोग्य तपासणी शिबिर घेऊन कारखान्यातील कर्मचारी व ऊस तोडणी कामगार यांचे आरोग्य जपण्याचे काम केले. तसेच रक्तदान शिबीर , वृक्षलागवड,शालेय साहित्याचे वाटप यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जोपासली.महाराष्ट्र -कर्नाटक सिमेवर बंद आवस्थेत असणाऱ्या साखर कारखान्यास उर्जित आवस्थेत आणून हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम व व्यवसायिक-लघू व्यवसायिक यांना कारखान्याच्या माध्यमातून चालना देण्याचे काम आवताडे शुगर ने केले.दरम्यानच्या काळात आवताडे बंधूवर अनेक प्रकारचे आरोप करत शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला परंतु त्याला न जुमानता आवताडे बंधूंनी शेतकरी व सर्व सामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना अतिशय उत्तम प्रकारे चालवून शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरला असल्याचे त्यांनी सांगितले

कोट –

        शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढीस आवताडे शुगर ने आधुनिक पद्धतीने तयार केलेले कल्चर मिश्रीत कंपोस्ट खत भरनीसह प्रति टन 1050/- या अत्यल्प दरामध्ये कारखाना स्थळावर उपलब्ध केलेला आहे तरी यांचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी व व्यवसायिकांनी घ्यावा
-मोहन पिसे,कार्यकारी संचालक, आवताडे शुगर

यावेळी या गळीत हंगामामध्ये ट्रक/ट्रँक्टर, डंपीग व बैलगाडी सर्वात जास्त वाहतूक करणाऱ्या ऊस वाहतूकदारांमध्ये प्रथम क्र. दामाजी शामराव बंडगर, अंबादास पांडुरंग लवटे, गोविंद बाबासाहेब खेंगरे, द्वितीय क्र. दादासो राजाराम लेंडवे, अनिल शिवाजी घोळवे, मनोहर त्रिबंक जाधव, तृतीय क्र. सिध्दलिंग सुरेश कोळी, सुनिता बाबासो माने, लिंबाजी दादाराव जाधव, यांनी सर्वात जास्त वाहतूक ऊसस वाहतूक केली असल्याने ठेकेदार यांना उत्तेजनार्थ बक्षिस बहाल करुन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर दिलीप जाधव, चिफ केमिस्ट् मोहन पवार, फायनान्स मॅनेजर रघूनाथ उन्हाळे, डेप्युटी चिफ इंजिनिअर श्रीकांत रोंगे, इलेक्ट्रिक मॅनेजर सुरेश निर्मळ, एचआर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव, आयटी मॅनेजर मिनहाज शेख, सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड, साहाय्यक सुरक्षा अधिकारी रणजित पवार अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक, वाहतुक ठेकेदार व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More