Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढ्यात अवकाळी चा दणका

द्राक्ष डाळिंब ज्वारी पिकाचे नुकसान

182

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात ऐन थंडीच्या मौसमात अवकाळी पावसाने मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात हजेरी लावल्यामुळे द्राक्ष, डाळिंब यासह ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे
मंगळवेढा तालुक्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही भरपाई मात्रअद्याप पर्यंत मिळालेली नाही याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आश्वासने फोल ठरलेली आहेत नुकसानग्रस्त पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसुलकडून अद्याप सुरू असताना आता ऐन थंडीच्या मोसमात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे दिनांक 11 पासून ग्रामीण भागासह मंगळवेढा शहरात पावसाने चांगलीच हजेर लावली आहे आज दिनांक 12 रोजी मंगळवेढा शहरात साडेपाचच्या सुमारास अर्धा तास पावसाने हजेरी लावली त्या पावसामुळे द्राक्ष व डाळींबाच्या बागांचे नुकसान पोहोचणार आहे काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांची छाटणी केल्यामुळे नव्याने घड निर्मिती होत आहे तर काहींची छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचे फळांचे ज्वारी व गव्हाएवढी आकारमान बनलेले असल्यामुळे या अवकाळी पावसामुळे मनिगळ झाली आहे ऑगस्ट, ऑक्टोबर हंगामामध्ये मध्ये धरलेल्या डाळिंबाच्या बागाच्या फळांना याचा त्रास होणार आहे आगाप पेरलेल्या ज्वारी मंगळवेढा शिवारात पोग्यात आल्या आहेत तर काही ठिकाणी ज्वारीचा फुलोरा धुवून गेल्याने ज्वारी पिकाचे नुकसान होणार आहे मागास पिकांना या अवकाळी चा फायदा होणार असला तरी फायद्यापेक्षा नुकसान मोठे होणार आहे अनेक ठिकाणी कांदे काढून टाकलेले आहेत या पावसामुळे कांदे खराब होणार आहेत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सातत्याने नुकसान होत असून या नुकसानिकडे सरकारचे व विमा कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या फार मोठ्या संकटात आला आहे याची जाणीव सरकारला नसून सरकार मात्र आश्वासने देऊन या याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे

मंगळवेढा तालुक्यात आज झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन देखील त्यांना भरपाई मिळालेली नाही आजच्या पावसाचे नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अन्यथा स्वाभिमान युतीने आंदोलन केले जाईल

-युवराज घुले समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More