Take a fresh look at your lifestyle.

खरेदी विक्री संघाच्या हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा दिनांक 15मार्च रोजी शुभारंभ -चेअरमन सिद्धेश्वर आवताडे

218

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
          मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ नाफेड महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येत असलेल्या 2022 -23 शासकीय हमीभाव हरभरा चना या योजनेचा शुभारंभ दिनांक 15मार्च रोजी होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पणन अधिकारी हरिदास भोसले व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा प्रमोद दुरगुडे यांच्या हस्ते व खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर बबनराव अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
          तसेच शेतकरी बांधवांनी कार्यालयाकडून हरभरा विक्री करण्यासाठी सोडण्यात आलेल्या एसएमएस प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावे असे आवाहन चेअरमन सिद्धेश्वर बबनराव अवताडे यांनी केले आहे.

         तसेच शेतकरी बांधवांना खरेदी केंद्र संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास संस्थेचे व्यवस्थापक शंभू नामदेव नागणे
9405214595 व खरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख मच्छिंद्र कोंडू भैरी 9890831934यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More