Take a fresh look at your lifestyle.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील – सरपंच सीमा काळुंगे

फटेवाडी येथे महिला दिन साजरा

270

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
         महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय वाढीसाठी मदत करणारा असून महिलांनी केवळ गृहिणी बनवून न राहता सामाजिक व आर्थिक प्रक्रियेत सहभागी व्हायला पाहिजे असे मत फटेवाडी येथील सरपंच सिताराम महाराज मल्टीस्टेटच्या संचालिका सीमाताई काळुंगे यांनी व्यक्त केले.
         यशश्री महिला ग्राम संघ आणि ग्रामपंचायत फटेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने फटेवाडी ता मंगळवेढा येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सीमाताई काळुंगे व उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उमेद अभियानच्या श्रीमती काटकर यांनी केंद्र व राज्य सरकारकडून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी सवलती देण्यात येतात त्या सोयी सवलती व इतर योजनांची माहिती यावेळी उपस्थित महिलांना दिली. कृषी सहाय्यक गवळी यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रिया उद्योग व शेती विषयक योजनांची सविस्तर माहिती दिली.               

            यावेळी उपसरपंच पल्लवी शिंदे, ग्रामसेवक डी जे गायकवाड, बचत गटाच्या सीआरएफ मनिषा फटे, ग्राम संघ लिपिक भाग्यश्री फटे, अध्यक्ष अनिता निकम, सचिव अर्चना अवताडे, जोत्सणा फटे,हौसाबाई चव्हाण, शरीफा बारगीर, माजी सरपंच विद्या फटे यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More