Take a fresh look at your lifestyle.

ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत ब दर्जा प्राप्त झालेल्या देवस्थान विकास कामांसाठी ५ कोटी ३३ लाख रुपये निधी मंजूर – आमदार समाधान आवताडे

खोमनाल,हिवरगाव लक्ष्मी दहिवडी या गावांचा समावेश

343

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी
राज्याच्या ग्रामविकास खाते अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, हिवरगाव व लक्ष्मी दहिवडी या गावातील ब दर्जा प्राप्त देवस्थानांच्या भौतिक सुविधा विकासासाठी ५ कोटी ३३ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

          सदर विकासकामी निधी मंजूर होण्यासाठी आमदार आवताडे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयामार्फत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.
               ब दर्जा प्राप्त वरील हिवरगाव येथील श्री कामसिद्ध देवस्थान या ठिकाणी पुरुष व स्त्रिया भाविकांसाठी यात्रीभक्त निवास बांधण्याच्या कामासाठी १ कोटी ४७ लाख तर वाहनतळ व शौचालय बांधण्यासाठी ५३ लाख रुपये तर खोमनाळ येथील श्री कामसिद्ध देवस्थान येथे पुरुष व महिला भाविक भक्तांसाठी यात्री भक्तनिवास बांधण्यासाठी १ कोटी ४७ लाख व वाहनतळ शौचालय बांधण्यासाठी ५३ लाख रुपये, त्याचबरोबर लक्ष्मी दहिवडी येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी येथील देवस्थान येथे तीर्थक्षेत्र विकास अनुषंगाने येणाऱ्या महिला यात्रेकरुंसाठी भक्तनिवास बांधणे ४५ लाख, रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी ३८ लाख, संरक्षक भिंत बांधणे २५ लाख व व मंदिर आवाराभोवती पेव्हिंग ब्लॉक व पाणीपुरवठा करणे २५ लाख रुपये असा निधी मंजूर झाला आहे.
              राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने आमदार आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघाच्या धोरणात्मक विकासासाठी रस्ते, वीज, पाणी व आरोग्य या बाबींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. आमदार आवताडे यांची विकासात्मक दृष्टी या मतदारसंघातील जनतेच्या कृतिशील आणि व्यापक प्रगतीसाठी खूप मोठा माइलस्टोन ठरत आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्र ब दर्जा प्राप्त असणाऱ्या देवस्थानांसाठी भौतिक सोयी – सुविधा अधिक गतिमान करण्यासाठी तसेच या देवस्थानाच्या देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी अतिशय उपयोगी ठरणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.

           तालुक्यातील अध्यात्मिक आणि धार्मिक परंपरेची चौकट आणखी समृद्ध करण्यासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर व पंचायत समिती मंगळवेढा माजी उपसभापती पुत्र धनंजय पाटील यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून वरील ब दर्जा प्राप्त असणाऱ्या देवस्थानांना एवढा भरीव निधी मंजूर करणेकामी खूप मोठे सातत्य ठेवले होते. वास्तविक पाहता या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची गर्दी खूप मोठी असून सदर निधीमुळे येणाऱ्या भाविकांना सोयी उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वरील गावातील सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गाव पातळीवरील समाजकारण आणि राजकारणामध्ये सक्रिय राहून जनतेची निस्वार्थ भावनेने सेवा करत असताना आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होत असल्याने पदरी घेऊन विविध गावांच्या विकासाची स्वप्ने साकार होत आहेत.

 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More