श्री संत दामाजी मंगळवेढा गटपातळीवरील औद्योगिक संस्थेच्या चेअरमन पदी समाधान दत्तू यांची तर व्हा चेअरमन पदी राहुल नागणे यांची बिनविरोध निवड
मंगळवेढा प्रतिनिधी
श्री संत दामाजी मंगळवेढा गटपातळीवरील औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था मर्या मंगळवेढा( खादी ग्रामोद्योग) या संस्थेच्या चेअरमन पदी समाधान हरिदास दत्तू यांची तर व्हा चेअरमन पदी राहुल नागणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सहकार व पणन विभागाशी संबंधित असणाऱ्या या संस्थेच्या 22-23ते27-28या कालवधीसाठी संचालकांची निवड नुकतीच बिनविरोध झाली होती आज दिनांक सात रोजी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी निवड करण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी समाधान दत्तू व बिरुदेव घोगरे यांचे अर्ज आले होते आणि घोगरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने दत्तू यांची निवड बिनविरोध झाली व्हा चेअरमन पदासाठी राहुल नागणे व बिरुदेव घोगरे यांनी अर्ज भरले होते. घोगरे यांनी अर्ज माघार घेतल्याने राहुल नागणे यांची बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर खरेदी विक्री संघाचे चेअरमन व दामाजी कारखाण्याचे संचालक सिध्देश्वर आवताडे यांच्या हस्ते समाधान दत्तू व राहुल नागणे यांच्यासह सर्व संचालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यानिवडीच्या वेळी नूतन संचालक बिरुदेव घोगरे, चंद्रकांत पवार, सचिन कदम, चन्नविर लंगोटे, वैशाली शिवशरण, सुनीता अवघडे,प्रशांत महामुरे, सूर्यकांत पवार, शरद घोडके आदी उपस्थित होते निवडीनंतर नूतन पदाधिकारी यांचा निवडणूक निर्णय अधिकारी लिंबोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

