प्रतिकूल परिस्थितीत प्रज्ञा फटे हिने मिळवलेले यश प्रेरणादायी -तहसीलदार स्वप्निल रावडे
एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलेल्या प्रज्ञा फटेचा गावकऱ्यांकडून जंगी सत्कार
मंगळवेढा प्रतिनिधी
क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत एम पी एस सी तील प्रज्ञा फटे हिचे यश कौतकास्पद आहे . तिने एवढ्यावर न थांबता यु पी एस सी चे ध्येय बाळगावे असे प्रतिपादन तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी फटेवाडी येथे व्यक्त केले
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमध्ये ९०० पैकी ५२७।७५ गुण मिळवून प्रज्ञा दगडु फटे हीने महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींमध्ये ३९ वी येण्याचा मान मिळविल्याबद्दल फटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने तिच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपिठावर माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, दामाजी चे संचालक औदुबंर वाडदेकर, सरपंच सिमा काळुंगे ज्येष्ठ पत्रकार समिर इनामदार उपस्थित होते.
प्रारंभी प्रज्ञा फटे हिचे न संपुर्ण फटेवाडी गावातील महिलांनी गावाच्या वेशीत औक्षण करुन,गावामध्ये गुढया उभारुन, रांगोली काढून हालगी,ताशा व फटाक्याच्या कडकडात प्रज्ञा फटे हिचे स्वागत करुन मिरवणुक काढण्यात आली.
सदर प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार समीर इनामदार म्हणाले छ. शिवाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीत ज्या प्रमाणे शत्रू पक्षाला पराभूत केले त्याप्रमाणे तालुक्यातील नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असून देखील प्रज्ञाने त्यावर मात करत मिळवलेले यश कौतकास्पद आहे. ग्रामीण भागातील मुली वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कौशल्य दाखवून सामाजिक बदल घडवत आहेत मुलगी हुशार असल्याने परिस्थिती बेताची असली तरी दगडु फटे यांनी मुलीसाठी केलेली धडपड लाखमोलाची आहे.
सत्काराला उत्तर देताना प्रज्ञा फटे म्हणाली ग्रामीण भागातील मुली शिकल्या पाहिजेत, त्यांची बुध्द्ीमत्ता पाहुन पालकानी प्रोत्साहन दिले पाहिजे. जि.प.शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला आहे। माझ्या शिक्षणची सुरुवात माझी आत्या अंगणवाडी सेविका शारदा काळुंगे यांचेपासुन झाली. त्याच माझ्या आद्य गुरुआहेत मला घडविण्यामध्ये माझे गुरु शिक्षक यांचा मोठा वाटा आहे आपण एवढ्या यशावर न थांबता भविष्यात मोठ्या पदाला गवसणी घालण्यासाठी सज्ज आहे वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत कोणतेही क्लास न लावता पहिल्या प्रयत्नात आपण हे यश मिळवले आहे . यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले
यावेळी समस्त फटेवाडी ग्रामस्थांचे वतीने आई वडिलासह प्रज्ञाचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांचे स्विय सहाय्यक रावसाहेब फटे, प्रकाश काळुंगे, विष्णुपंत फटे, उपसरपंच पल्लवी शिंदे,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील सुनिल फटे, माजी सरपंच राजेंद्र फटे,अड किरण पडवळे,दिनेश लुगडे,संभाजी इंगोले दत्तात्रय फटे इंजिनिअर लुगडे,केतन फटे,चंदन फटे, मारुती लेंडवे,सिद्राम शिंदे,मनोहर निकम, संजय फटे, जनार्दन कोंडूभैरी,औदुंबर आवताडे,पोपट फटे,संभाजी चव्हाण,स्वप्नील कोंडुभैरी, चंद्रकांत लेंडवे,मासाळ गुरुजी,लेंडवे गुरुजी, अजित यादव, प्रशांत यादव, पत्रकार मल्लिकार्जुन देशमुख, संभाजी नागणे, चंद्रकांत करडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . सुत्रसंचालन आणि आभार अशोक उन्हाळे यांनी केले.

