बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख प्रतिक किल्लेदार यांचा अनोखा उपक्रम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिनी जन्मलेल्या 5 मुलींच्या नावे केले प्रत्येकी 5858रुपये फिक्स डिपॉझिट
मंगळवेढा प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 9 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या 58 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना मंगळवेढा शहरप्रमुख प्रतिक अरुण किल्लेदार यांच्यावतीने मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील त्या दिवशी जन्माला येणारे मुलींच्या नावे 5858 रुपये फिक्स डिपॉझिट करण्यात आले असून त्याचे प्रमाण पत्र मुलींच्या आईकडे देण्यात आले.
येथील पूजा सुनील चव्हाण, श्वेताली संग्रामसिंह बाबर, कोमल विकास मोरे, महानंदा शंकर माने, पल्लवी ओंकार महामुनी या लाभार्थ्यांना फिक्स डिपॉझिट प्रमाणपत्र देण्यात आले.सदर कार्यक्रम प्रसंगी शहरप्रमुख प्रतिक किल्लेदार, भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस विजय बुरुकुल, डॉ. अकबर मुलानी, डॉ. पुष्पांजली शिंदे, डॉ. रिहाना मुलानी, डॉ. रवींद्र नाईकवाडी, उद्योजक दिग्विजयसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य अमित गवळी, गणेश मेहकर आदी उपस्थित होते.

