Take a fresh look at your lifestyle.

आ समाधान आवताडेंच्या पाठपुराव्यामुळे पंढरपूर एम. आय. डी. सी. कामाला गती

शासकीय गोष्टींची पूर्तता करण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

278

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

            पंढरपूर शहर व तालुक्याच्या आर्थिक दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या व बेरोजगारी वर मात करण्यासाठी महत्वपूर्ण असणारा व गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारा पंढरपूर एम. आय. डी. सी. चा प्रश्न आ आवताडे यांनी अत्यंत पोटतिडकीने शासन दरबारी मांडत तो सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला असताना या प्रश्नासाठी प्रशासकीय पातळीवरील कामाची गती वाढविण्याचे निर्देश उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
              एम आय डी सी च्या अनुषंगाने उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी बैठक संपन्न झाली.सदर बैठकीमध्ये पंढरपूर एम.आय.डी. सी संदर्भात आमदार आवताडे यांनी आत्तापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींची माहिती मंत्री महोदय यांच्यासमोर मांडली. आमदार आवताडे यांनी मांडलेल्या या माहितीच्या आधारे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या प्रश्नाच्या अनुषंगाने त्वरित आवश्यक शासकीय गोष्टींची पूर्तता करून पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आमदार आवताडे यांच्या आत्तापर्यंत केलेल्या मागणीला व पाठपुराव्याला मोठे यश आल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये दिसत आहे. पंढरपूर तालुका व शहर मधील युवक युवतींच्या बेरोजगारीचा प्रश्न या एम.आय.डी. सी मुळे मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. त्यासोबत तालुक्याच्या आर्थिक समीकरणाची चाके सुद्धा अधिक गतिमान होणार आहेत.
                त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील एम.आय.डी. सी या व्यावसायिक संकुलास व्यापक व विस्तारित रूप देण्यासाठी उद्योजकांना या एम. आय. डी.सी मध्ये छोटे – मोठे उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी प्राधान्याने गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. जे उद्योजक मंगळवेढा येथील एम.आय.डी.सी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य दर्शवतील अशा उद्योजकांच्या समस्या व अडी- अडचणी प्राधान्य क्रमाने सोडविण्यावरही यावेळी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा करण्यात आली. दुष्काळी तालुका अशी ओळख असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये या व्यवसायिक हबमुळे अर्थकारणास मोठी संजीवनी मिळणार असल्याचे मत आ आवताडे यांनी बैठकीत मांडले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More