Take a fresh look at your lifestyle.

आदर्श व सुसंस्कारीत पिढी घडवायची असेल तर जिजाऊंचा आदर्श ठेवा: डॉ प्रीती शिंदे

श्रीराम फाउंडेशन व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचा सन्मान

270

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
4 शतकापूर्वी अनेक संकटांचा सामना करीत जिजाऊंनी आदर्श राजा जन्माला घालून हिंदवी स्वराज्य उभारले परन्तु सध्याच्या काळातील आई मात्र बाळ पोटात असताना पिझ्झा व बर्गर खाऊन बाळाच्या जन्मानंतर नूडल्स व मॅगी चारतात. त्यामुळे शिवाजी महाराजांसारखे आदर्श व संस्कारित पुत्र कसा जन्मणार? असा प्रश्न करीत मुलांना संस्कारित बनवण्यासाठी आई वडिलांनी मोबाईलच्या आहारी न जाता मुलांकडे वेळीच लक्ष दिले जावे असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्यात्या डॉ प्रीती शिंदे यांनी मंगळवेढा येथे व्यक्त केले
राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माजी पक्षनेते अजित जगताप यांचे मार्गदर्शनाखाली श्रीराम फाउंडेशन व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचा सन्मान जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ मीनाक्षी कदम होत्या.उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्रीराम फाउंडेशन च्या अध्यक्षा सुप्रिया जगताप, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा इंदूमती जाधव, अजित जगताप ,प्रवीण खवतोडे आदी मान्यवर व्यासपीठावर होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ व सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ शिंदे म्हणाल्या,
सध्याच्या काळात आई वडील च मोबाईलच्या आहारी गेल्याने चांगली आणि संस्कारीत मुले कशी घडणार असा सवाल करत जिजाऊं त्या काळात घेतलेल्या धाडसी व त्यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या संस्कारामुळे स्वराज्य उभे राहिले. त्यांच्या कार्याचा गौरव होत असला सध्याच्या महिला त्या जाणिवेने त्यांचे कार्य आत्मसात करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मुलांच्या वाढदिवसानिमित्त महागडे कपडे घेऊन देण्याऐवजी त्याला चांगला व सुसंस्कृत बनवण्यासाठी पुस्तके द्या. लहानपणी मुलांना लावलेल्या वाईट सवयी घातक ठरू लागल्या. त्यामुळे आई वडिलांनी मुलांकडे वेळीच लक्ष दिले तर मुलांचा भविष्यकाळ उज्ज्वल होणार आहे.

 

सत्कारमूर्ती महिला—
उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील,
लताबाई शिकतोडे, विजया वाकडे, मंगल जाधव, सब्जपरी मकानदार, वर्षा दत्तू, आशा वाले, हसीना सुतार, स्मिता जडे, अवंती पटवर्धन, रागिनी कांबळे, सुरेखा खरात, लक्ष्मीबाई उपेवाड, लता माने, इनरव्हील क्लब मंगळवेढा, ज्ञानेश्वरी महिला स्वयं सहाय्य बचत गट, बचत गट समन्वयक युनूस मोगल, राजेंद्र खताळ, प्रदीप सपकाळ, संयोगिनी बचत गट, संगीता रजपूत, सुनिता चव्हाण, आशा पाटील, यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले

 

 

       यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील म्हणाल्या की ज्या काळात कोणत्याही सुविधा नसताना आदर्श राजा जिजाऊ घडवू शकल्या तर आताच्या मातानी सध्याच्या काळात आदर्श विद्यार्थी घडवावे, मोबाईलच्या जमान्यात आई व मुलगा यांच्यात अंतर पडले त्यासाठी संवाद असणे आवश्यक आहे. यावेळी प्रास्ताविक अध्यक्षा सुप्रिया जगताप यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती दिवसे -कोंडूभैरी यांनी केले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More