Take a fresh look at your lifestyle.

मारापूर ग्रामपंचायती वर आ समाधान आवताडे गटाचा झेंडा

सरपंच पदी विनायक यादव तर उपसरपंच पदी सुवर्णा आसबे यांची बिनविरोध निवड

808

- Advertisement -

मारापूर प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठी असणाऱ्या व लक्ष्मी दहिवडी गटात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व अटीतटीच्या झालेल्या मारापूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. पी. बी. पाटील यांच्या गटाकडून सत्ता खेचून  आणणाऱ्या  युवा उद्योजक विनायक यादव यांची सरपंच पदी जनतेतून निवड झाली तर उपसरपंच पदी सुवर्णा आसबे यांची बिनविरोध निवड झाली आहे                    उपरपंच निवडीसाठी दि 5 रोजी सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्यांची बैठक  येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी सौ. सुवर्णा अशोक आसबे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निरीक्षक श्री. एम. यु. कौलगे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलेला उपसरपंच पदाचा मान मिळाल

यावेळी  नूतन सरपंच विनायक यादव म्हणाले की विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारापुर ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत बनवण्याचा मानस आहे त्यामध्ये प्रामुख्याने वीज, पाणी, अंतर्गत रस्ते, आरोग्य उपकेंद्र, जिमखाना त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या वतीने मोफत वायफाय सेवा देण्यात येणार आहे तसेच मारापुर तावशी रोड वरती मान नदीवर बंधारा कम ब्रिज बांधण्यास प्रयत्न करणार असल्याचे सांगितले

सदर कार्यक्रमासाठी ग्रामसेवक प्रसाद देवकर, विजयाचे शिल्पकार राजकुमार यादव, भगवान आसबे, भुजंगराव आसबे, अमोल जानकर ,डॉ. सत्यवान यादव, अशोक यादव, बालाजी यादव, नाथा माने, अनिल माने, संतोष गांडुळे, सतीश वाघमारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब यादव ,सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य व मारापुर ग्रामस्थ उपस्थित होते

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More