Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी लतीफभाई तांबोळी यांची निवड

596

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी मरवडे येथील लतीफभाई हिरालाल तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी दिलेआहे. 

         लतिफ भाई तांबोळी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग प्रदेश उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयीन सचिव म्हणून देखील काम पाहिले. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर त्यांनी अजित पवार गटाची पताका हाती घेतल्यानंतर नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते.तांबोळी यांचे वक्तृत्व यासह त्यांच्या कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संमतीने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी तांबोळी यांची प्रदेश सरचिटणीस पदी निवड केली आहे.

         पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामन्यापर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाला पूर्णपणे मदत करणार असून आगामी येणाऱ्या निवडणुकात पक्षाची ताकद दाखवून दिली जाईल व वरिष्ठांनी टाकलेल्या जबाबदारीचे सार्थक केले जाईल असे तांबोळी यांनी सांगितले.त्यांच्या निवडीचे पत्र मुंबई येथील कार्यालयात दिनांक 12रोजी देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, पक्ष प्रवक्ते उमेश पाटील,आदी उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.

.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More