Take a fresh look at your lifestyle.

येड्रावचे भाचे धीरज लिंगाडे झाले अमरावती पदवीधर संघाचे आमदार

येड्राव गावात भाच्याच्या विजयाबद्दल जल्लोष साजरा

1,672

- Advertisement -

 

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी

मंगळवेढा ताल्युक्यातील येड्राव येथील माजी पंचायत समिती सभापती भुजंगराव पाटील ,कै. विलासराव पाटील व कै. एम.वाय. पाटील सर यांचे भाचे व महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कै. रामभाऊ लिंगाडे यांचे चिरंजीव धीरज लिंगाडे यांनी अटीतटीच्या निवडणूकीत अमरावती पदवीधर मतदारसंघातून माजी मंत्री भाजपाचे रणजित पाटील यांचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला आहे तिकीट जाहीर झाल्यानंतरअवघ्या पंधरा दिवसात आमदार होण्याचा मान मिळाल्याने लिंगाडे यांच्या मामाच्या गावात मात्र फटाक्यांची आतिष बाजी व गुलालाची उधळण करीत आमदार झालेल्या भाच्याला शुभेच्छा दिल्या आहेत

                धीरज यानी महाविकास आघाडीतून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवित भाजपचे उमदेवार व माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला. या मतदारसंघात 40 वर्षानंतर कॉंग्रेसला विजय मिळविता आला. या निवडणूकीत प्रचाराचे नियोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्रीयन बिल्डर असोशियनचे अध्यक्ष आनंद पाटील यांनी पार पाडली होती. या विजयाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. येड्राव परिसरात फटाक्याची आतिषबाजी करत विजय जल्लोष साजरा केला.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More