Take a fresh look at your lifestyle.

प्रशांत साळे यांच्या निवडीने आजोबाच्या दोस्तीला दिला तिसऱ्या पिढीने उजाळा

मंगळवेढा तालुका काँग्रेस च्या अध्यक्षपदी प्रशांत साळे, काँग्रेसशी एकनिष्ठ व ग्रामीण भागातील युवा नेतृत्वाला संधी

470

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसशी तीन पिढ्या एकनिष्ठ असलेल्या साळे कुटुंबाला न्याय देत प्रशांत साळे यांच्यावर तालुक्यातील काँग्रेस पक्षाची मुख्य जबाबदारी देऊन त्यांचे आजोबा सहकारमहर्षी शंकररावं मोहिते पाटील व प्रशांत साळे यांचे आजोबा दलित मित्र बाबासाहेब साळे यांच्यात असलेला दोस्ताना तिसऱ्या पिढीत कायम ठेवला असून एका नातूने दुसऱ्या नातूला नेतृत्वाची संधी दिली आहे त्यामुळे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत साळे यांना आपला करिष्मा दाखवण्याची संधी मिळाली आहे
मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेपर्यंत शहर व तालुक्यातील ग्रामीण भागावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते.त्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला होता तरी देखील अनेक दिवस आमदारकी वगळता स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसचे वर्चस्व होते स्व.आ. भारत भालके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर देखील हा मतदार पुन्हा काँग्रेसकडे भालकेच्या रूपाने वळला परंतु या मतदारसंघात यापूर्वी दलितमित्र दिवंगत बाबासाहेब साळे यांनी जिल्हा परिषदेवर समाजकल्याण सभापती म्हणून काम केले होते दक्षिण भागात त्यांना मानणारा वर्ग मोठा होता
कै बाबासाहेब साळे हे स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांचे समर्थक मानले जात होते नंतर बाबासाहेब साळे यांच्या स्नुषा व नूतन अध्यक्ष प्रशांत साळे यांच्या मातोश्री सुशीला साळे यांनी देखील काँग्रेसशी एकनिष्ठ रहात समाज कल्याण समितीवर सभापती म्हणून काम केले.स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष
पदाची धुरा घेतल्यापासून हळूहळू ते सक्रिय झाले. काँग्रेस पक्षाची बांधणी करताना जिल्हा व तालुका स्तरावर पुन्हा आपल्याच जुन्या समर्थकांना पक्ष बांधण्यात सामावून घेत निष्ठावंताना सक्रिय केले
हुनूर आश्रम शाळेच्या माध्यमातून रूपाने साळे परिवाराने तालुक्याच्या दक्षिण दुष्काळी भागात शिक्षणाची गंगोत्री आणून मोठा शैक्षणिक बदल घडवला आहे त्याचबरोबर पदाच्या माध्यमातून समाजकल्याणच्या विविध योजना व अन्य विकास कामाच्या माध्यमातून बाबासाहेब साळे व त्यांच्या स्नुषा सुशीला साळे यांनी भोसे जिल्हा परिषद गटात आमूलाग्र बदल घडवला आहे तालुक्यात राजकीय विखुरणी झाली असली तरी नागरिक व मतदारांशी त्यांचे नाते अतूट राहिले आहे

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील व वरिष्ठानी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून मंगळवेढा तालुक्यात काँग्रेसच्या नवीन व जुन्या नेत्यांना सोबत घेऊन मोठी फळी उभी करणार आहे मंगळवेढा तालुका काँग्रेसमय करण्यासाठी ‘काँग्रेस आपल्या दारी’ हे अभियान राबवणार आहे

  – मा प्रशांत साळे ,नूतन काँग्रेस तालुका अध्यक्ष

 

 

स्वर्गीय बाबासाहेब साळे व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेही अगदी जवळचे संबंध होते सुशीलकुमार शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून मंगळवेढा साळे कुटुंबाचे नाव अग्रभागी आहे सुशीलकुमार शिंदे यांनी वेळोवेळी काँग्रेस पक्षात साळे यांचेवर विश्वास टाकत मोठया जबाबदारीची पदे दिली विद्यमान नूतन अध्यक्ष प्रशांत साळे यांना केंद्रात मंत्री असताना केंद्र सरकारच्या कापूस सल्लागार समितीवर काम करण्याची संधी शिंदे यांनी दिली होती विधानसभेच्या पोट निवडणुकीत देखील या भागातील बहुतांश गावे ही राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या पाठीशी राहीली. काँग्रेसशी जवळीक साधलेल्या मतदाराकडे मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी व त्यांच्या प्रश्नाकडे फारसे लक्ष दिले न देता मात्र इकडल्या मताच्या जोरावर तालुक्यातील नेत्यांनी आपले राजकीय बस्तान बसवल्याचे दिसून आले मात्र स्व. आमदार कि रा मर्दा व दिवंगत बाबासाहेब साळे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत या भागातील गावोगावांच्या छोटया मोठया कार्यकर्त्याची मोठी फळी उभी करत डी सी सी बँक व साखर कारखाण्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबातील युवकांना रोजगार व नोकरीची संधी उप्लब्ध करून दिली
दक्षिण दुष्काळी पट्ट्यात हुन्नूर येथील प्रशांत साळे सारख्या युवा कार्यकर्त्याला पुन्हा एकदा काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यामुळे या भागातील प्रश्नाला न्याय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा परिस्थितीत साळे हे उच्च शिक्षित असून वरिष्ठ राजकीयओळखीचा देखील भविष्यात त्याचा फायदा होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साळे यांची ही निवड काँग्रेस साठी नवसंजीवनी ठरणार आहे आगामी काळात तालुक्यात काँग्रेसमध्ये मोठी युवकाची फळी निर्माण करण्याची जबाबदारी प्रशांत साळे यांचेवर पक्ष नेतृत्वाने टाकली आहे.
स्व. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील व स्व. बाबासाहेब साळे या दोन्ही घराण्याचे असणारे घनिष्ठ संबंध आता तिसऱ्या पिढीत कायम आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी साळे घराण्यातील तिसऱ्या पिढीतील प्रशांत साळे यांना तालुकाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी देऊन पिढीतील मैत्रीचे सम्बध अजूनही जोपासल्याचे दिसून येत आहे

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More