Take a fresh look at your lifestyle.

गाव विकासासाठी निधी मिळवून देणार :आ परिचारक

पांडुरंग परिवाराच्या वतीने परिचारक गट व समविचारी आघाडीच्या नुतन सरपंच व सदस्यांचा आ प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार

236

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनीधी
केंद्र व राज्य शासनाकडून लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतीना विकास कामासाठी भरपुर निधी सध्या मिळत आहे त्यामुळे गावाचा पुढील पाच वर्षांचा आराखडा बनवून निधी खर्च करावा व गावामध्ये विवीध योजना आणुन स्मार्ट गाव करण्याची जबाबदारी नूतन पदाधिकाऱ्यांनी पार पाडावी गावच्या विकासासाठी मागेल त्याला निधी देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन माजी आ प्रशांत परिचारक यांनी केले
मंगळवेढा तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत परिचारक गट व समविचारी आघाडी एकञित येत १८ ग्रामपंचायती पैकी ११ ग्रामपंचायतीमध्ये परिचारक गट व समविचारी आघाडीच्या नुतन सरपंच व सदस्यांचा सत्कार युटोपीयन शुगर लि.पंतनगर येथे माजी आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करणेत आला. त्यावेळी ते बोलत होते

      यावेळी दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, युन्नुसभाई शेख,दामाजीचे संचालक औदुंबर वाडदेकर,माजी उपसभापती काशिनाथ पाटील,न.पा.पक्षनेते अजित जगताप,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, भारत पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,दामाजी शुगरचे संचालक बसवराज पाटील महादेव लुगडे,रेवणसिध्द लिगाडे,दिगंबर भाकरे,तानाजी कांबळे,उपसभापती संतोष घोडके बबलु सुतार,गुलाब थोरबोले,माधवानंद आकळे,अरुण पाटील,पिंटु गवळी,हरी हिप्परकर,सुरेश पाटील,सतीश आवताडे,प्रकाश येलपले,दुशासन दुधाळ,मेघराज दोडके,श्रीकांत गणपाटील,शशिकांत सावंत,संतोष डांगे,विश्वास खुळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना परिचारक म्हणाले,गावाच्या विकासासाठी विविध योजना निधी मिळवुन देण्यासाठी तसेच गावाच्या ज्या समस्या आहेत त्या शासनाच्या माध्यमातुन सोडवण्यासाठी नूतन सरपंच व सदस्य यांनी सक्रिय राहिले पाहिजे गावातील प्रमुख नकाशावरील रस्ते असतील,पाणंद रस्ते,गावअंतर्गत रस्ते यासाठी विवीध योजनेतुन ग्रामपंचायतीला निधी मिळवुन देण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहोत.
यांचा झाला सन्मान

गोणेवाडीचे नुतन सरपंच बाबासाहेब मासाळ,तळसंगीचे नुतन सरपंच प्रदिप पाटील,शिरनांदगीचे सरपंच  माया गुलाब थोरबोले,मारोळीचे सरपंच राजकुमार पाटील,येड्रावचे सरपंच संजय पाटील,हाजापुरचे सरपंच  मैना दादासो देवकुळे,पौटचे सरपंच महादेव हिप्परकर,भालेवाडीचे सरपंच श्रीकांत दवले,बावचीचे सरपंच राजु गाढवे,ढवळसचे सरपंच  रोहिणी सुधाकर हेंबाडे,फटेवाडीचे सरपंच  सीमा प्रकाश काळुंगे,सलगर खुर्दच्या सरपंच आरती अजय कांबळे यांच्यासह व सर्व नुतन ग्रामपंचायत सदस्य 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More