मंगळवेढ्यात समविचारी चा झेंडा
शिवानंद पाटील ,रामेश्वर मासाल यांची सत्ता कायम भालेवाडी,मारापूर, हाजापूर येथे सत्ताबदल
मंगळवेढा तालुका प्रतिनीधी
मंगळवेढा तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत परिचारक व समविचारी आघाडीने 11, भालके गटाने 10 ,आ आवताडे गटाने 10तर सिद्धेश्वर आवताडे गटाने 5 ठिकाणी विजयाचा दावा केला आहे
तालुक्यातील तळसंगी मारोली,गोणेवाडी ,पाठखल येद्राव, शिरनांदगी,येथे सत्ताधार्यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे मंगळवेढा तालुक्यातील 18 ग्रामपंचयत साठी नुकतीच निवडणूक झाली होती त्यात फटेवाडी आपले राहटेवाडी येथील निवडणूक बिनविरोध झाल्या होत्या ग्रामपंचायत मतमोजणी आज येथील शासकीय गोडाऊन मध्ये पूर्ण झाली सकाळी साडेआठ वाजता मतमोजणी सुरू होऊन 11 पर्यंत सर्व निकाल हाती आले निवडणुकीचे निकाल हाती येतात विजयी झालेल्या उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी केली या निवडणुकीमध्ये विजयी झालेले सरपंच पुढीलप्रमाणे- खोमनाळ- बायदाबाई मदने(726)
येद्राव- संजय पाटील( 761)
गुंजेगाव- विमल चौगुले 895
ढवळस- रोहिणी हेंबाडे(516)
डोंगरगाव -सारिका विवेक खिलारे(704)
बावची -दशरथ बिरा गाढवे (655)
सोडडी -काशीबाई सिदमला बिराजदार (791)
पौट- सोना महादेव हिप्परकर535 मारोळी -राजकुमार रामगोंडा पाटील (964) हाजापूर- मैना दादासो देवकुळे
शिरनांदगी- माया गुलाब थोरबोले(894)
भालेवाडी श्रीकांत दवले 673
पाठखल -आनंद हर्षराज बिले 883
मारापूर-विनायक माधवराव यादव (991)तळसंगी- पूजा प्रदीप पाटील(1146)
विजयी सदस्य गाव निहाय
तळसंगी-
पूजा पाटील सारिका केंगार अनिल मुंगसे,विठाबाई कवणाले,विजय सूर्यवंशी ,साईनाथ दुधाळ,रेशमा मुंगसे कल्पना बिचुकले,विकास जाधव,बजरंग दुधाळ ललिता गडगे
मारापूर —
निलेश आसबे,रानुबाई आसबे,सुवर्णा आसबे,समाधान कोळी,बंडू पाटील,शुभांगी मांडवे,चैतन्य सातपुते,द्वारकाबाई जानकर,राणी माने
मारोली-
संताजी लोखंडे, मीराबाई मोहिते,खुतबुद्दीन शेख,सोमनिंग हिंचंगेरी,भामाबाई करे,गौराबाई हट्टाली,रविराज बिराजदार,तुळसाबाई गावडे
शिरणानंदगी-
चिंगुबाई खांडेकर,अंकुश किसवे, राजू कांबळे,चंदाबाई ऐवले,पारुबाई थोरबोले,कमलाबाई काशीद,इंद्राबाई थोरबोले,मीराबाई कोळेकर,शांताबाई खान्देकर
बावची-
दत्तात्रय जाधव ,गणेश चव्हाण, सुशीला खांडेकर, धर्मराज माळी, भारती मोरे ,शाबिरा पाटील संकेत सुंठे, उषाबाई जाधव, पद्मिनी घाडगे
सोडडी-
सुगलाबाई बिरोनगी, वृनाका कलाल, आप्पासाहेब भोरकडे, सुरेश कमते, शोभा बिराजदार, सुनिता कमते, गंगाराम बिराजदार, शिवमा नरोटे, संगीता बिराजदार
डोंगरगाव –
प्रदीप चौगुले, सुजाता खडतरे, अमिना पठाण, अनिता माळी, विशाल साखरे, शुभांगी लोहार ,नकुशा हेंबाडे , सय्यद अंबिर,सचिन शिंदे,राणी मोरे
गोणे वाडी- तानाजी चव्हाण, सिंधू गवळी, तुकाराम सलगर,शितल कसबे, बंडू मासाळ ,कलावती मासाल पल्लवी मासाळ
ढवळस-
भारती मोरे, सौदागर गायकवाड, अश्विनी मोरे, दीपक महाजन, सुरेखा कवडे, सतीश मोरे
गुंजेगाव–
लक्ष्मी चौगुले, चित्रा डूम अंकुश कुंभार, जिजाबाई मेटकरी वंदना बुडबुडे, अंकुश काळुंखे, मैनाबाई ढोणे, नारायण चौगुले
येद्राव-
निशा पाटील, अमोल माने, महादेव कोळेकर, सुज्ञानी पाटील ,सोनाली गोडसे, संजय पाटील, सचिन खांडेकर, रखमाबाई ढावरे, अर्चना पाटील
खोमनाळ –
सुशीला पवार, सुनिता सरवदे, संतोष कळूबरमे,वर्षा इंगळे, वर्षा हजारे, धनाजी ठोंबरे, सुभाष देशमुख, लक्ष्मण काळे
भालेवाडी-
उषा गवळी, वैशाली शिवशरण, वर्षाराणी गवळी, लिंगेश्वर गवळी, दिपाली गवळी, प्रताप गवळी ,ज्ञानोबा माने
पाटकळ-
जिजाबाई मेटकरी, फुलाबाई सावंत, बंडू काळे, शारदा खुळे प्रदीप पवार, कल्पना डांगे, तानाजी गोडसे ,शशिकांत सावंत ,पल्लवी खुळे, रामेश्वर ताड,
पौट-
राजश्री म्हमाणे, विलास होवाळे, अश्विनी निमंग्रे, लक्ष्मी सांगोलकर, मथुरा निमंगरे ,जनाबाई आयवळे ,पोपट सांगोलकर
खोमनाल येथे अश्विनी सुळखुंडे व कल्पना पवार यांना समसमान मते(227) पडली चिट्टी मध्ये कल्पना पवार या निवडून आल्या गुंजेगाव येथे राहुल खांडेकर व पांडुरंग ढोणे यांना समसमान मते(311 )पडले चिठ्ठीमध्ये राहुल खांडेकर हे निवडून आले मारापूर,खोमनाल, डोंगरगाव,भालेवाडी ढवळस येथे सत्ता बदल झाला आहे निवडीनंतर विजयी उमेदवारानी भालके परिचारक, आ आवताडे ,बबनराव आवताडे यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार स्वीकारले मिरवणुकीस बंदी असल्याने विजयी उमेदवारांसह समर्थकांना आपल्या उत्साहावर काही प्रमानात निर्बंध घालावे लागल्याचे चित्र यावेली दिसत होते
DocScanner Dec 20, 2022 10-34 AM 
दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे
गोणे वाडी येथे राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष रामेश्वर मासाल यांनी पाचव्यांदा सत्ता संपादन केली आहे तर मारोली येथे दामाजीचे संचालक बसवराज पाटील यांनी हॅट्ट्रिक केली आहे पाठखल येथे उषा हर्षराज बिले या विद्यमान सरपंच असून पुन्हा त्यांचा मुलगा सरपंच झालास आहे तर शिरणानंदगी येथे गुलाब थोरबोले यांच्या पत्नी 21व्या वर्षी सरपंच झाल्या होत्या पुन्हा दुसऱ्या वेळी त्याच सरपंच झाल्या आहेत भाले वाडी येथे माजी समाजकल्याण सभापती शीला शिवशरण व दामाजीचे माजी संचालक सचिन शिवशरण यांनी विद्यमान सत्ताधारी मंडळींना बाजूला सारत समविचारी लोकांना एकत्र करीत सत्ता संपादन करीत आपली ताकद दाखवून दिली आहे तर मारापूर येथे विनायक यादव यांनी कारखान्यातील पराभवाचे उट्टे काढत राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष पी बी पाटील गटाला पराभवाची धूळ चारली आहे

