मंगळवेढ्यात आआवताडे विरोधात समविचारीचा सामना
16 ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तालुक्यात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील अठरा पैकी2 ग्रामपंचायतच्या सरपंचासह सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे उरलेल्या 16 ग्रामपंचायत मध्ये भालेवाडी,तळसंगी, मारापुर पाठखळ गोणेवाडी मारोळी या ठिकाणच्या लढती रंगतदार होणार असून यामध्ये दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्यासह दामाजीचे चार संचालक व जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती शीला शिवशरण या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे
मंगळवेढा तालुक्यातील 18 सरपंच व 154 सदस्य त्यांच्यासाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्य फटेवाडी व रहाटेवाडी येथील दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य निवडी बिनविरोध झाले असून उर्वरित 16 ग्रामपंचायत साठी सरपंच सदस्य पदासाठी निवडणूक लागल्या आहेत
मंगळवेढा तालुक्यात प्रामुख्याने कै आ भारत भालके गट,आ समाधान आवताडे गट आ प्रशांत परिचारक गट व जेष्ठ नेते बबनराव आवताडे गट असे चार गट कार्यरत असून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी सोयीने एकमेकांशी आघाडी केली आहे काही ग्रामपंचायती मध्ये दामाजी कारखान्याप्रमाणे समविचारी आघाडी चा प्रयोग झाला आहे दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या तळसंगी गावात पाटील यांचे अनेक वर्षांपासून ग्रामपंचायती वर वर्चस्व असून सरपंचपदासाठी त्यांच्या सुनबाई उभ्या असून विरोधात आ समाधान आवताडे गटाने पारंपारिक विरोधक दिला आहे
मारापूर येथे समविचारी आघाडी व आ आवताडे गटात टक्कर होत आहे समविचारी कडून दिनकर यादव व माजी सरपंच विनायक यादव यांच्यात अटीतटीची लढत होत असून विनायक यादव हे आ आवताडे यांचे जवळचे नातेवाईक आहेत येथे समविचारीने आघाडीचे दामाजीचे संचालक पी बी पाटील व आ आवताडे गटाने ही लढत प्रतिष्ठित बनवली आहे
शिरणानांदगी येथे विद्यमान सरपंच माय्याका थोरबोले व प्रियंका खताळ यांच्यात समोरासमोर लढत होत असून समविचारी व आ आवताडे गट अशी लढत होत आहे मारोली येथे कै भालके गटाचे दामाजीचे संचालक बसवराज पाटील यांचे सलग दोन वेळा सदस्य राहिलेले बंधू राजकुमार पाटील रिंगणात उभारले आहे गेल्या तीन टर्म एकहाती सत्ता राखणारे पाटील यांना अडवण्यासाठी आ आवताडे गटाने पॅनल उभे करून सत्ता बदलाचा प्रयत्न चालू ठेवला आहे
पाठखल येथे सरपंचपदासाठी 8 तर 10 सदस्यपदासाठी 28 अर्ज राहिल्याने मतदार देखील समभ्रमात पडले आहेत विद्यमान सरपंच उषा हर्षराज बिले यांचा मुलगा ऋतुराज बिले हे रिंगणात उतरले असून ते कै आ भारत भालके गटाचे नेतृत्व करीत आहेत तर दुसरीकडे परिचारक समर्थक दामाजीचे विद्यमान संचालक महादेव लुगडे यांनी आपल्या मुलाला सरपंचपदासाठी उभे केले असून परिचारक व आ आवताडे गटातील सहकाऱ्यांना सोबत घेतले आहे तसेच उद्योजक बाळू ताड यांनी भालके गट व आवताडे गटातील नाराज मंडळींना सोबत घेऊन तिसरे पॅनल केले आहे येथे आ समाधान आवताडे यांना स्वतंत्र पॅनल करता आले नाही गोणे वाडी येथे विद्यमान उपसरपंच असलेले विष्णू मासाल यांनी राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष व विदयमान सरपंच रामेश्वर मासाळ यांच्यापासून फारकत घेत भालके गटाशी गटाशी युती केली असून त्यांच्या पत्नी उर्मिला मासाळ ह्या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत येथे भालके अवताडे परिचारक गट एकत्र आला असून त्यांच्याविरोधात रामेश्वर मासाळ यांचा गट लढत देत आहे हजापूर येथे समविचारी आघाडी विरोधात अवताडे गट अशी निवडणूक होत असून बिनविरोधची चर्चा असताना ऐनवेळी निवडणूक लागली आहे येथे समविचारीचे पाच सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत
डोंगरगाव येथे भाजप पुरस्कृत अवताडे परिचारक गटाविरोधात भालके यांच्या दोन गटात लढत होत आहे येथे भाजपा युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांच्या पत्नी सारिका खिलारे ह्या निवडणूक लढवीत असून त्यांच्या विरोधात माजी सरपंच धनंजय माळी व सुशीला आकळे ह्या निवडणूक लढवीत आहेत ढवळस येथे विद्यमान सरपंच प्राध्यापक सिद्धेश्वर मोरे यांच्या गटात फूट पडून तेथे दोन गट निर्माण झाले आहेत तर विरोधक असणारे माजी सरपंच शिवाजी हेंबाडे व शेतकरी संघटनेचे नेते सिद्धेश्वर हेंबाडे हे एकत्रित आले आहेत त्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे येड्राव येथे माजी उपसभापती काशिनाथ पाटील यांचे पुतणे संजय पाटील हे सरपंच पदाचे उमेदवार असून त्यांच्या विरोधात जालिंदर माने दौलत माने गटाकडून उद्योजक वैशाली हिरालाल माने या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत विद्यमान सरपंच हे काशिनाथ पाटील यांचे पुत्र आहेत गुंजेगाव येथे भालके आणि परिचारक त लढत होत असून अवताडे गटाचे कार्यकर्ते दोन्ही गटाकडे आहेत येथे माजी पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय पाटील यांचे पुत्र सिद्धेश्वर पाटील यांना विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रावसाहेब चौगुले हे लढत देत आहेत
खोमनाळ येथे पारंपारिक विरोधकात लढत होत असून यावेळी पहिल्यांदाच शेतकरी संघटने नेते व बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख यांचे सुपुत्र सुभाष देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिले आहेत ग्रामपंचायत निवडणुकीत देशमुख यांचा सक्रिय सहभाग हा पहिल्यांदाच आहे भालेवाडी , बावची पौट सोडडी येथे परिचारक ,आवताडे भालके व स्थनिक आघाडी त निवडणूक होत आहे या निडणुकीत आ आवताडे यांनी लक्ष दिले असते तर अजून काही ग्रामपंचायती बिनविरोध होण्यास मदत झाली असती दामाजी कारखान्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत देखील समविचारी चा पॅटर्न राबवला जात आहे
फटेवाडी येथे समविचारीने बाजी मारत निवडणूक बिनविरोध करत सरपंच पदी सीमा काळुंगे यांची निवड केली तसेच आमदार समाधान आवताडे यांनी रहाटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करत विरोधी गटाच्या जगदीश पाटील गटाला सरपंच पद देऊन निवडणूक टाळली आहे

