महावितरण मंगळवेढा उपविभागाच्या उप कार्यकारी अभियंता पदी महेश शिपूरे
आ. समाधान आवताडे यांनी नियुक्ती बद्दल केला सत्कार
मंगळवेढा प्रतिनिधी
महावितरण मंगळवेढा उपविभागाच्या कार्यकारी अभियंता पदी महेश शिपुरे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपला पदभार आज दिनांक 26 रोजी स्वीकारला आहे.
गेल्या 1 वर्षापासून मंगळवेढा येथील उपकार्यकारी अभियंता पद रिक्त होते.येथील अतिरिक्त कार्यभार पंढरपूर ग्रामीण -1 चे उपकार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांच्याकडे होता. त्यांची बदली कोल्हापूरला झाल्याने ते पद पुन्हा रिक्त झाले होते.
महेश शिपुरे यांनी जत, कोल्हापूर, सांगली येथे तसेच पदोन्नतीवर पंढरपूर येथे सहाय्यक अभियंता म्हणून काम केले आहे.नुकतीच महेश शिपुरे यांची महावितरण मंगळवेढा तालुक्याच्या उपकार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नतीवर बदली झाली असून त्यानी आज दिनांक 26 रोजी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या निवडीबद्दल आ समाधान आवताडे यांनी सत्कार केला. यावेळी शिपुरे यांनी तालुक्यातील वीज ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा देवून विजवसूली चांगल्या पद्धतीने करून सोईसुविधा देण्यास प्राधान्य राहील असे सांगितले. येथील कार्यालयात पदभार स्विकारल्यानंतर ठेकेदार संतोष पवार, विजय मिसाळ, संभाजी नागणे, प्रशांत गडकर, उल्हास पाटील, दादा इंगळे यांच्यासह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.

