प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना हुतात्मा च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय स्व.अरुणभैय्या नायकवडी स्मृती पुरस्कार प्रदान
प्रा.काळुंगे यांनी पुरस्काराच्या रक्कमेत स्वतःचे 25हजार रुपये टाकत दिली 50हजाराची देणगी
मंगळवेढा प्रतिनिधी
वाळवा येथील हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय स्व.अरुणभैय्या नायकवडी स्मृती पुरस्कार मंगळवेढ्याचे प्रा.शिवाजीराव काळुंगे यांना 25 हजार रोख, सन्मान चिन्ह,मानपत्र देवून वाळवा येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.
पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचारांवर वाटचाल कायम ठेवत समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्त्वांचा गौरव वाळवा येथील हुतात्मा संकुलाच्या वतीने स्व.अरुणभैय्या नायकवडी यांच्या १९ व्या स्मृती दिनी 24 फेब्रुवारी रोजी हुतात्मा शिक्षण संकुलात हा पुरस्कार प्रदान केला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना हुतात्मा चे चेअरमन वैभव नायकवडी म्हणाले, गेल्या 19 वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या बरोबरीने पाणी संघर्ष चळवळीत काम केले आहे. गोरगरिबांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटच्या माध्यमातून केलेले काम कौतुकास्पद आहे. तसेच सीताराम कारखान्याच्या माध्यमातुन शेतकरी व शेतमजूर कष्टकऱ्यांना त्याची देयके वेळेत बिले अदा करून जीवनमान उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रा काळूंगे यांना हा पुरस्कार देत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यानी सांगितले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. शिवाजीराव काळूंगे म्हणाले, स्व.नागनाथ आण्णांच्या प्रेरनेने कोणताही स्वार्थ न ठेवता तन मन धनाने काम केले. हुतात्मा समूहाने पुरस्कार देवून कौतुकाची थाप पाठीवर दिल्याने अजून समाजासाठी लढण्याचे बळ आले आहे.आण्णांच्या त्यागामुळे 13 दुष्काळी तालुक्याला पाणी मिळाले आहे. धनश्री,सीताराम परिवाराच्या माध्यमातून समाजासाठी मोठे काम केले.आमच्या घडण्यामध्ये अण्णांचे योगदान मोठे असून त्यांच्या विचारांवर आम्ही सामाजिक,आर्थिक,पाणी चळवळीत काम करत असल्याचे त्यानी सांगितले. यावेळी बोलताना शोभाताई कालुंगे यांनी आण्णांच्या आठवणी सांगत आण्णांच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी हुतात्मा चेअरमन वैभव काका नाईकवाडी, हुतात्मा डेअरी चे चेअरमन गौरव नायकवडी,युवानेते वीरधवल नाईकवाडी,धनश्री च्या चेअरमन प्रा,शोभाताई कालुंगे,बाबुराव गुरव,हुतात्मा चे कार्यकारी संचालक समीर सलगर,दामाजीचे संचालक राजेंद्र पाटील,दयानंद सोनगे,ज्ञानदेव जाविर,दत्तात्रय पाटील, यादापा माळी,युवराज गडदे,रमेश भांजे,विनोद पाटील,सुनील पाटील,रावसाहेब पाटील,प्रभाकर कलुबरमे,प्रकाश कालुंगे,विलास सरवळे,अड. भारत पवार, कवी इंद्रजित घुले,दिलीप कलूबरमे, बाळासाहेब यादव, आदी उपस्थित होते.
चौकट –
प्रा शिवाजीराव कालुंगे यांना यावेळी पुरस्कारात मिळालेल्या 25हजाराच्या रकमेत प्रा. कालुंगे यांनी स्वतःची 25हजाराची रक्कम देत पुढील काळात शाळेत चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यासाठी 50हजाराची रक्कम हुतात्मा शिक्षण समूहाच्या स्वाधीन केली.

